(टीम म्हसळा लाईव्ह)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेडचे(रत्नागिरी )कार्यकर्ते संतोष.मो.जंगम यांचे वयाचे 38 व्या वर्षी पुणे काळेवाडी येेथे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने नुकतेच निधन झाले. ते कट्टर मनसैनिक होते, त्यानी युवा सामाजिक शक्ती एकत्रित करण्या साठी सामाजिक मंडळांजवळ विशेष बांधीलकी ठेवली होती पुणे येथील पिंपरी-चिंचवड कोंकण खेड युवा-शक्ती कार्यकर्ते व जयहनुमान मित्र मंडळ नांदिवली केळेवाडी या मंडळाजवळ त्यांचे सामाजिक संबध होते.या मंडळाचे पदाधिकाऱ्यानी जंगम यांचे कुटुंबीयांची खेड येथे भेट घेऊन सांत्वन कले. अकाली निधन झालेले संतोष जंगम व म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल मधील शिक्षकेत्तर सेवक व सामाजिक कार्यकर्ते संतोष .धों .जंगम यांचे नाते संबंधामुळे संतोष जंगम यांचे म्हसळा करांजवळ सुद्धा जवळचे नाते होते कोराना व लॉक डाऊनच्या कालावधीत जंगम यानी खेड व म्हसळा तालुक्यात विशेष मदत केली होती. यामुळे जंगम यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन, पत्रकार संजय खांबटे,उदय कळस ,प्राचार्य मच्छिद्र जाधव ,N.E.S .चे प्राचार्य के.एल. जाधव सर्व स्टाफ,
स्कुलचे अरमन समीर बनकर, मंगेश मुंडे ,अजित पाटील , राहटे सर व पाष्टे सर , रोहन कळस , मातोश्री पार्क मधील सर्व सदस्य यांनी जंगम वहीनींचे प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले.
إرسال تعليق