म्हसळा शहरातील अस्वच्छतेबद्दल भाजप आक्रमक ; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन


म्हसळा नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार

म्हसळा वार्ताहर
 म्हसळा नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. नगरपंचायत ने स्वच्छते वर लाखो रुपये खर्च करून देखील नगरपंचायत परिसर स्वच्छ नाही आहे. नगरपंचायत ने स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून .म्हसळा शहरातील गटारे उघड़ी असून  जागोजागी कचरा पडलेला. गटारे  सांड़पाण्यानी तुटुंब भरली आहेत, याच्या कड़े नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गधी व रोगराईला सामोरे जावे लागत आहे या करिता भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले. प्रसंगी नगरपंचायत मा. मुख्याधिकारी यांनी आश्वसन दिले आहे की येत्या एका आठवड्यात म्हसळा शहर स्वच्छ दिसेल. यावेळी तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश रायकर, शहर अध्यक्ष श्री.संतोष पानसरे, तालुका सरचिटणीस श्री.सुनिल शिंदे, तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, जिल्हा चिटणीस श्री. तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.दुर्जनसिंग राजपूत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. राजेंद्र चव्हाण, सुबोध पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा