कोकण रेल्वेला अल्प प्रतिसाद


प्रतिनिधी :- कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला . मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या गाड्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला. शासनाने अनलॉकची घोषणा केल्यानंतर सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरूवअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर -सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आणि बेंगळुरू सिटी या चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दररोजच्या क्षमतेच्या ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या १२५ टक्क्यांपेक्षाही जास्त असते


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा