परतीच्या अवकाळी पावसामुळे बळीराजा हैराण



तळा(किशोरपितळे)

यंदा २०२०साल एका विचित्र मार्गावर चाल करीत असताना पहायला मिळत आहे.
प्रत्येकाला अनेक समस्या चा सामना करावा लागत आहे.कोरोना संकट,चक्रीवादळ,लाँकडाऊन आर्थिक मंदी नोकरीवर गदा व्यवसाय बंद,काम दम बंदी अशा अनेक समस्या मधून सावरत असताना बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहेअशी परिस्थिती निर्माण झाली आहे जूनच्या
सूरवातीलाच निसर्गानेकोकणात चक्रीवादळातहोत्याचे नव्हते करून पहिलाच दणका दिला. तरी देखील "वाकेन पण मोडणार नाही" याउक्ती प्रमाणे ताट कण्याने कोकणी शेतकरी पुन्हा तेवडाच उभा राहीला. सप्टेंबर महिना म्हणजे शेतकऱ्यांची सुगी परंतु, सततच्या अवकाळी पावसाने गेले दोन तीन वर्ष पिकावंर परिणाम झाला आहे त्यामुळे कंटाळून कोकणातील शेतकरी शेती न करण्याच्या मानसिकतेत आहे.जिवापाड कष्टकरूनही अतिर्वुष्टीमुळे आणि रोगराई मुळे शेतीचे नुकसान होत आहे. निसर्गाच्या अनियमितपणा मुळे वातावरणात बदल होत चालले आहेत दिवसें दिवस महागाई वाढत चालली आहे त्यामुळे मजुरीही परवडतनाहीजंगलतोड झाल्यामुळे वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. या पावसाने
वर्षभरात केलेल्या मेहनतीवर स्वप्नावर नांगर फिरवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव नाही. तरीही यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई आणि राज्यात इतरत्र शासनाने संपूर्ण लाँकडाऊन केल्यामुळे बरेच लोक काही दिवस मुंबईतुन गावाला आले होते. त्यामुळे बरेच वर्षे ओस पडलेली शेती जमेल त्या पद्धतीने लागवडीसाठी तयार  करून काही प्रमाणात पेरणी करून लागवड ही करण्यात आली  पंरतु  यंदाही आँक्टोंबरमहिना अर्धा झाला तरीही वादळी वाऱ्याच्या लाटेने वीचेच्या कडकटासह मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांची अतिशय नासाडी झाली आहे.

यंदा बऱ्यापैकी भात तयार झाली असतानाच अतिर्वुष्टी मुळे धान्याची नासाडी झाली आहे आताही काही प्रमाणात भात,नाचणी,वरी तयार होऊनही त्याची कापणी करण शक्य नाही.यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा..अन्यथा कोकणातील शेतकऱ्यांना जीण मुस्किल झाले आहे.अशी प्रतिक्रिया  शेतकरी यशवंत शिंदे खाबंवली यांनी आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा