श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा करानी तटकरे कुटुंबीयांवर केलेले प्रेम कधीही विसरणार नाही: खासदार सुनील तटकरे व मान्यवरांचे संघटना मजबुतीकरणावर जोर
संजय खांबेटे : म्हसळा
कोविड 19 प्रादुर्भाव कालावधीचे सहा महिने संपल्यावर शासन स्तरावर हळूहळू सर्वच बाबतीत अनलॉकिंग करण्यात येत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार सुरेशभाऊ लाड
यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठक आज दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी घनसार काँम्प्लेक्स येथे
आयोजित करण्यात आली या वेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदीती तटकरे व जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यानी स्थानिक कार्यकर्तां जवळ संवाद साधला यावेळी राजीप उपाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती गीताताई जाधव, जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे, जि.प सदस्या पाटील ,पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा,जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, युवती अध्यक्ष सायली दळवी ,तालुका अध्यक्ष समीर बनकर,प्रदेश चिटणीस अलीशेट कौचाली,
रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नाझीम हसवारे, ओबीसी सेल अध्यक्ष गणेश पवार, विजय उर्फ बंधु मोरे , आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यानी "मी पुन्हा येईन" भाजपाचे "मंदीर उघडा धोरण" यावर घाणाघाती टिका करण्याची संधी सोडली नाही तर मोठया प्रमाणावर नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या गुजरात राज्यांत "गरबा नृत्य" याचाही भाजपाने खुलासा करावा असेही अवाहन तटकरे यानी केले.केंद्राचे कृषीविषयक व उद्योग विषयक धोरण कसे चुकीचे आहे त्यामुळे शहरी व ग्रामिण भागातील शेतकरी व कामगारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आसल्याचे आभ्यासू पणे मांडले.श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा करानी आम्हा तटकरे कुटुंबीयांवर केलेले प्रेम आम्हीकधीही विसरणार नाही हे आवर्जुन सांगताना आम्हीही श्रीवर्धन -म्हसळ्याचा विकास हाच ध्यास हे धोरण राबविल्याचे सांगितले. २००९ साली श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचा एखाद दुसरा ग्रामपंचायत सदस्य असताना आज म्हसळा तालुका १०० % राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे हे सांगितले. हे केवळ आम्ही केलेले धर्मनिरपेक्ष राजकारण केल्यामुळेच शक्य झाले म्हसळा कराना विकासाचे नवीन दालन उघडल्याचे खासदार तटकरे यानी सांगितले.
खासदार सुनिल तटकरे यानी मुख्यमंत्री , महाआघाडीचे मुख्य समन्वयक व राज्य सरकारचे मानले आभार
"राज्यावर कोव्हीड १९ चे संकट असतानाही कोकणावर आलेल्या निर्सग चक्री वादळाचे संकटांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वो सर्वा खासदार शरद पवार यानी केलेल्या श्रीवर्धन म्हसळा दौऱ्यावेळी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे NDRFच्या निकषांत बदल करून कोकणातील शेतकरी, फळबागायतदार व व्ययक्तीक नैसर्गिक नुकसान ग्रस्ताना तीप्पट नुकसान भरपाई देऊन केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले."
खासदार तटकरे यानी राज्य शासन हे महा विकास आघाडीचे असल्याने शासन व्यवस्थेतील विविध समीत्या नेमताना त्या प्रमाणात घटक पक्षाना संधी देण्यात येईल हे आवर्जुन सांगितले.
यावेळी पालकमंत्री आदीती तटकरे यानी म्हसळा करा सर्व कार्यकर्तानी कोरोनाजवळ प्रवळ लढताना, निर्सगावर पण एकोप्याने मात केली ह्याचे कौतुकच आहे. म्हसळा कराना भविष्यात विकासात काहीच कमी पडणार नाही असे सांगितले.
जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यानी अतिशय आभ्यासू पणे भविष्यात संघटना वाढीसाठी विविध सेलच्या नेमणूका कशा करायच्या आहेत याचा आभ्यास उपस्थिताना दिला. यावेळी तुरूंबाडी ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यानी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.
फोटो जाहीर प्रवेश व मान्यवरांचे भाषण करताना
Post a Comment