"या" प्रलंबित मागण्यांसाठी मा.आमदार माणिक जगताप यांनी घेतली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट


जलविद्युत प्रकल्प प्रलंबित मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मा.आमदार माणिक जगताप अध्यक्ष - रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी घेतली भेट.

राम भोस्तेकर माणगाव

दिनांक १ ऑक्टोबर जलविद्युत प्रकल्प प्रलंबित मागण्या  संदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मा.आमदार माणिक जगताप अध्यक्ष - रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी मुंबई मंत्रालय येथे जाऊन भेट घेतली, या भेटी दरम्यान घरांचा मूल्यांकन अंतिम निवाडा ८५ कोटी वरून थेट २४ कोटी करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांचे झालेले आर्थिक नुकसान तसेच त्यांना सहन करावा लागणार मानसिक त्रास याबाबतीत तसेच प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व विविध समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मा.आमदार माणिक जगताप अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, जलविद्युत शेतकरी उत्कर्ष समिती सचिव यशवंत गायकवाड, माजी सरपंच ग्रमपंचायत सांदोशी प्रवीण सर्कले, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर राकेश गायकवाड आदी पदाधीकारी उपस्थित होते. सकारात्मक चर्चा होऊन लवकरच या संदर्भात बैठक बोलवली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी  दिली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा