रोहा (वार्ताहर)
महाराष्ट्रात व रायगड जिल्ह्यात सध्या रक्ताची नितांत गरज आहे अशा गरजेच्या वेळी रोह्याची मातृसंस्था असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयाने रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी घेतलेल्या स्तुत्य पुढाकाराबद्दल रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे व सर्व टीमचे विशेष कौतुक केले.
भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे शारदोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे ना. आदिती तटकरेंच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या.
भाटे वाचनालय आणि तटकरे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करून भाटे वाचनालयाने घेतलेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तटकरे कुटुंबियातील सार्वजनिक जिवनात काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याला मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगून पुढील काळात सुद्धा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाटे वाचनालयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी तत्पर राहीन असे ना. आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
या वेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार कविता जाधव,पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अनिकेत पाटील,पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा नगरपरिषद गटनेते मयुर दिवेकर, नगरसेवक दिवेश जैन, शहर अध्यक्ष अमित उकडे, चंद्रकांत पार्ट,युवा नेते मयुर पायगुडे, रवींद्र चाळके, निलेश शिर्के,युवक अध्यक्ष सागर भोबड,माजी नगरसेवक अल्ताफ चोरडेकर, मजीद पठाण,राकेश कागडा, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. अभय ससाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष किशोर तावडे यांनी ना. आदिती तटकरे यांचा वाचनालयाच्या वतीने यथोचित स्वागत सत्कार केला.
सदर रक्तदान शिबिरासाठी रोहेकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
जनकल्याण रक्तपेढि महाड यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिरासाठी रक्तसंकलन करण्यात आले. जनकल्याण रक्तपेढि महाडचे विजय म्हसकर, डॉ. नमिता दीघे, रविकांत शिंदे व टीमने या शिबिरासाठी चांगले सहकार्य केले.
सदर रक्तदान शिबिराला कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रायगड जिल्हा शांतता समिती सदस्य आप्पा देशमुख, माजी नगरसेवक महेश सरदार, संदीप सरफळे, पत्रकार महादेव सरसंबे ,आदर्श शिक्षिका विद्या रोहेकर, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे आदी मान्यवरांनी
सदिच्छा भेट दिली.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष हेमंत ओक,सामाजिक कार्यकर्ते निखिल दाते, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, व टीमने चांगली मेहेनत घेतल्याचे भाटे वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांनी सांगितले.
किशोर तावडे यांच्या नेत्रुत्वाखाली भाटे वाचनालयातर्फे उपाध्यक्ष वसंत भट, सह कार्यवाह महेश कुलकर्णी, माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका सौ.सायली कुळकर्णी, स. ग्रंथपाल सौ. रश्मी खराडे आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
إرسال تعليق