किरण शिंदे / लोणेरे
समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी , समाजीक बांधीलकीच्या भावनेने कार्यरत राहून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक परिवर्तन घडवून आनणारी देशव्यापी कार्य करणारी स्वपपुर्ती फाउंडेशनकडून आकाश पवार यांची रायगड जिल्हा मिशन अॅडव्हायजर पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. स्वप्नपूर्ती फाउंडेशन समाजसेवी संस्था असून समाजप्रबोधनाचे व समाजसेवेचे कार्य करत असून आपले कोणतेही कार्य समाजाचे हित हेच आपले हित समजून दिलेली जबाबदारी मी निस्वार्थपणे पार पाडीन अशी ग्वाही त्यांनी दिली. सदर संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर अजित माने व सचिव श्रीकांत मनवर यांनी नियुक्तीचे पत्र आकाश पवार यांना सुपूर्द केले. आकाश पवार हे महाड-बिरवाडीचे सुपुत्र असून अनेक समाजोपयोगी कार्ये शिवाय नृत्यकला, वेशभूषा अशा सांस्कृतिक कलेमध्ये प्रामाणिकपणे कार्य करत असतात.
إرسال تعليق