तळा (किशोरपितळे)
यंदाचे वर्ष अतीशय विचित्र परिस्थितीतुन जात असुन सर्वांना त्रासदायक झाले आहे.कोरोना,निसर्ग चक्रीवादळ,लाँकडाऊन परतीचा पाऊस, वादळ-वारा विजासह मेघ गर्जना करीत पावसाची जोरदार बँटीग अशा अनेक समस्या बरोबर शारीरिक व मानसिक यातना भोगाव्या लागत असतानाच कोकणातील भातशेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.यंदा अतिशय पिकाची परिस्थिती उत्तम असून बळीराजा खुश होता.तळा तालुक्यातील लहान मोठी ६५ असून परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या शेतीचे काहि प्रमाणात तरी नुकसान झाले आहे. या निसर्गाने बळीराजाचा कणाच मोडला आहे.या बळीराजा देशाच्याअर्थ व्यवस्थेत कणा म्हटले जाते.वर्षभरमेहनतीने केलेल्या भातशेती वाया गेली आहे.याआस्मानी संकटांंबरोबर जंगली जनावरांद्वारे शेतीचे नुकसान हे संकट किती गहिरे आणि व्यापक आहे याची कल्पना उर्वरित समाजाला पुरेपूर नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.शेतात पेरणी केल्यापासून तर शेवटचे पीक निघेपर्यंत म्हणजे पीक शेतकऱ्याला पोटच्या पोरासारखे जगवावे व राखावे लागते. दिवसभर शेताचे काम आणि रात्रभर शेताची राखण.पेरणी केल्यापासून जंगली जनावरांचा व
(पक्ष्यांचा) उपद्रव सुरू होतो. रात्री व दिवसा मिळून रानडुक्कर, पक्षी येऊन पेरलेले सर्व बियाणे व रोपे उकरून खातात व अनेक पटींनी जास्तीची नासाडी करतात.सारी पेरणी वाया जाते.पेरणीनंतर, उगवलेली रोपे,पुढे उभी पिके, शेवटी आलेल्या शेंगा, कणसे, फळे, बोंडे हे सर्व रानडुक्कर, माकडे, मोर, पोपट इ. मंडळी काहीच सोडत नाहीत.दिवसा व रात्री राखण केली नाही तर *सारे फस्त, पीक जमीनदोस्त आणि शेतकरी उद्ध्वस्त!*होताना दिसत आहे.यांंना आवर कोण घालणार? शासनाने या रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजनाकरण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.यासाठी सरकारकडून महसूल वन-विभागाकडून जी भरपाई मिळण्याची तथाकथित तरतूद आहे.ती फार जाचक,आणीअपुरी आहे."'भीक नको पण कुत्र आवर''अशीच अवस्था झाली आहे असे सर्व बहुसंख्य शेतकरी संताप व्यक्त करीतआहेत.अजून काय आणी किती शेतकऱ्याला भोगावे लागणार आहे.कृषि विभागाने पिक विमा संरक्षण योजना राबवली असून सरसकट विमा संरक्षण मिळावे अशी मागणी प्रगत शेतकरी पुरस्कार प्राप्त केतन वाजे चरई व समीर तांबडे, भानंगकोंड यांनी केली असून शासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष घालूनया रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्याचीमागणी वन विभाग व कृषी विभागाकडे केली जात आहे.
तालुका कृषीअधिकारी यांनी शासनाच्या आदेशानुसार कृषी विमा संरक्षण योजना राबविली.सद्यस्थितीत नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्यात आले.सर्व्हे केला मिळालेल्या माहितीनुसार भात शेती कापली असता नैसर्गिक आपत्ती झाली तरच विमा संरक्षण मिळते. अशी माहिती प्राप्त झाली आहे. मग शासनाने शेतकऱ्याकडून विमा रक्कम जमा करून लयलूट केली आहे.
केतन वाजे, आधुनिक प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त
Post a Comment