तळा प्राथमिक मराठी केंद्रीय शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश.

 


तळा प्राथमिक मराठी मुलांची (केंद्रीय शाळा) हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश.

तळा (किशोरपितळे)फेब्रुवारी२०२०मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला असून तळा तालूक्यातील तळे मराठी शाळेने(दगडी शाळा) या स्पर्धा परीक्षेत एक किर्तिमान स्थापित केला आहे.

शिक्षण विभागाने पूर्वी चा पँटन बदलून पाचवी व आठवी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा केली असून तो अभ्यास क्रम एम.पी.एस.सी.च्या धर्तीवर केला आहे. आणी हा अभ्यासक्रम विद्यार्थीयांनी यशस्वी रित्या पुर्ण करून प्राथमिक शाळेचे नाव उज्ज्वल केले असून मराठी शाळांना हिणवणाऱ्या लोकांना चपराक दिली आहे.यावर्षी शाळेचे ७विदयार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६ विदयार्थी पास झालेअसून ५ विदयार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.प्राथमिक शाळेत दर्जेदार आणि सर्वोत्तम शिक्षण देते हे या शाळेने दाखवून दिले आहे.या शाळेचे विदयार्थी कु.अनमोल माटल २२६गुण(प्रथम) कु.नैतिक फुलारे २१० गुण(द्वितीय) कु. ईशा वरंडे १९० गुण(तृतीय)  कु.प्रांजल शिगवण १८० गुण  कु.आदित्य राठोड १७० गुण व कु सार्थक कासार १४४ गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून शाळेचे नाव उज्वल केले आहे.पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतील. भविष्यात अशा स्पर्धा परीक्षा त देखील यश संपादन करतील असा विश्वास वाटतो. या सर्व यशस्वी मेहनती कष्टाळू विदयार्थ्यांचे व सुनील बैकर (मुख्याध्यापक) धुटूकडे सर,श्रीमती बुरूड मँडम,घोडके मँडम (सहशिक्षक)या मार्गदर्शक शिक्षकांचे तळातालुक्यातुन खुप खुप अभिनंदन केले जात आहे.





कु.अनमोल माटल २२६गुण(प्रथम) कु.नैतिक फुलारे २१० गुण(द्वितीय)



Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा