पेण प्रतिनिधी
अशोक त्रिंबक म्हात्रे, बोर्झे ता. पेण यांचे दि. 10 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षाचे होते.
अशोक म्हात्रे काळ भैरव क्रीडा व युवक मंडळाचे कार्यावाहक होते. उत्तम कबड्डी पट्टू असा नावलौकीक त्यांनी मिळविला होता. बोर्झे गावातील व्यायामशाळेत झोपणार्या मुलांकडून ते व्यायाम करून घेत. अशोक म्हात्रे हे काळभैरव संघाचे प्रशिक्षक होते. सालाबाद प्रमाणे साजर्या होणार्या काळभेैरव जयंती या कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असे. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्याचे आयोजन व कार्याक्रमाचे संपूर्ण नियोजन ते करीत असत.
ते हनुमान मंदिर देवस्थानाचे विश्वस्त होते. सेक्रेटरी म्हणून त्यांना कामाचा अनूभव असल्यामुळे दोन वर्षाच्या काळात हनुमंताचे भव्य असे टुमदार मंदिर त्यांनी उभे केले. दरवर्षी होणार्या हनुमान जयंतीचा उत्सवाच्या आयोजनातही त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र पोरके झाले आहेत.
إرسال تعليق