म्हसळ्यात पॉस्को अंर्तगत गुन्हा दाखल ; अल्पवयीन मुलीच्या छेड-छाडीबाबत : ३२ वर्षीय इसमास अटक


संजय खांबेटे : म्हसळा
सहज गंमत म्हणून केलेल्या गोष्टीचा बालमनावर कसा परीणाम होतो त्याचा प्रत्यय आज म्हसळा कराना दिसला. कर्तव्यदक्ष सपोनी धनंजय पोरे यानी क्षणाचा विलंब न लावता गुन्हा नोंदवून मुलीची छेडछाड करणाऱ्या नदीम महमद साहेब मिठागरे या ३२ वर्षीय विवाहीत इसमास तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अर्नथ टाळला.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की म्हरळा शहरांत MSCIT चे क्लाससाठी देवघर कोंड येथील सुमारे १७ वर्ष वयाची एक विद्यार्थीनी क्लास बंद म्हणून. दिघी नाक्यावर थांबली असता. तेथे असणाऱ्या ३२ वर्षीय विवाहीत व एक मुल असलेल्या इसमाने मुलीला हातवारे करत मुलीला नको असताना सुद्धा तिच्याजवळ संवाद साधण्याचा प्रयत्न केला व तुझा मोबाईल नंबर मला दे असा आग्रह करू लागला. मुलीने सदर इसमाचे हावभावावरून संशय आल्याने आरडा-ओराडा केला. दिघी नाक्यावर तैनातीला असलेले वहातुक पोलीस देवीदास कारखेले यानी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधीत इसमाला तात्काळ पोलीस स्टेशनला नेले म्हसळा पोलीसानी गुन्हेगाराला तब्यात घेऊन भा.द.वि.३५४ (ड) ,बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायदा(पॉस्को) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून सपोनी धनंजय पोरे तपास करीत आहेत.

"म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच पोलीस स्टेशनवर जमाव जमण्याची परंपरा, म्हसळा पोलीसानी तात्काळ गुन्हा नोंद केल्याने यावेळी तुटली त्यामुळे म्हसळा पोलीसांचे कौतुक होत आहे"

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा