म्हसळ्यात मळणी करत असताना विंचू दंशाने १६ वर्षीय विद्यार्थी दगावला
आरोग्य यंत्रणा सशक्त व पारदर्शक नाही का? मंत्रतंत्र श्रेष्ठ आहे तालुक्यात चर्चा
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भाताची मळणी करीत असताना इंगळीने दंश केला म्हणून ११वीत शिकणारा मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद म्हसळा पोलीसांत अकस्मात मृत्यू रजी १६ / २०२० ने केली आहे. मनिषचा मृत्यू काल सायंकाळी ५चे दरम्यान झाला.
याबाबत घटना अशी मनिष गोवर्धन पयेर वय १६ मूळ रा. खरसई हा आपले आजोबा शांत्या भगत यांचे मळणीवर भारे झोडत असताना उजव्या पायाच्या बोटांचे बेचक्यात काळ्या जहरील्या इंगळीने जोरदार दंश केला. तात्काळ इंगळी मारून आजोबा शांताराम हा मूळचा भगत आसल्याने त्याने नातवाचा इंगळी दंश उतरवला, भरल्या उन्हात काही वेळातच मनिष ला घाम येऊ लागल्याने त्याला तात्काळ नजीकच्या मेंदडी प्रा.आ. केंद्रात दाखल केले रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर मनिषला पुढील उपचारासाठी म्हसळा ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रवासांत मानिष मृत झाल्याचे ग्रामिण रुग्णालयाचे वैयकिय अधिकारी डॉ.महेश मेहता यानी सांगितले.
आरोग्य यंत्रणा सशक्त नाही का मंत्रतंत्र श्रेष्ठ आहे ?
गेले अनेक वर्ष म्हसळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रचंड तकलादू झाली असताना सर्प, विंचू, श्वान दंशावर आरोग्य यंत्रणेपेक्षा ग्रामिण भागातील जनतेचाअद्यापही तंत्र मंत्रावर जास्त विश्वास आहे. अनेक वेळा रुग्ण मेडीकल व तंत्र मंत्राचा बरोबरीनेच वापर करतात असे दिसते.परंतु सर्प, विंचू, श्वान दंशावर अतिशय चांगला व आभ्यासू औषध उपचार शासकीय आरोग्य यंत्रणेद्वारे होत असतो.
"मेंदडी येथून सुटलेली अॅम्ब्युलन्स म्हसळा ग्रामिण रुग्णालयात उशीरा पोहचली त्यामुळे उपाय करण्यापूर्वीच रुग्ण दगावला अशी मेंदडी -खरसई भागातचर्चा आहे"
"विंचू चावल्यावर काही लोक मांत्रिकाला बोलावतात. मंत्रतंत्र करण्यात बराच वेळ फुकट जातो. त्यामुळे त्या भानगडीत न पडता त्या व्यक्तीला त्वरीत शासकीय रुग्णालयामध्ये न्यावे. रुग्णाला चालत नेऊ नये. विंचू दंश झाल्यावर शरिरात ३० तासांपेक्षा अधिक काळ विष राहाते त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते , काही वेळा रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात चोवीस तासांपेक्षा जास्तवेळ ठेवावे लागते. मूळात विंचू दंशामुळे रुग्णाच्या शरिरात जाणाऱ्या विषाचे प्रमाण हे वेगवेगळे असते. ऋतुमानाप्रमाणे व विंचवाच्या क्षमेतेनुसार ते बदलते. रुग्णाच्या वयानुसार त्याची गंभीरता वाढू शकते. रुग्णाच्या लक्षणांवरून म्हणजे नाडीचे ठोके, रक्तदाब, घाम येणे, श्वासाची गती यावरून विष किती प्रमाणात शरिरात भिनले आहे याचा उपचार करताना आभ्यास करावा लागतो"
डॉ. महेश मेहता, ग्रामिण रुग्णालय म्हसळा
Post a Comment