तळा तालुक्यात पावसाला दमदार सुरुवात बळीराजा सुखावला ; १४१मिलिमिटरची नोंद



तळा(किशोर पितळे)
पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने आता चांगलाच जोर धरला असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.शेताच्या बांधावर बसून येरे येरे पावसा..तुला देतो पैसा..हे वरूणराजाने गार्हाणे ऐकले आणी कालपासून जोरधरला आहे.त्यामुळे भात शेती लावणीसाठी शेतात घुसला आहे.पावसाने डोळे वठारल्यामुळेतोंडचे पाणी पळाले होते.काहीजण तर डिझेलपंप भाड्याने घेऊन पाणी घेत होते तर काही आवण जगवण्यासाठी डोक्यावर पाणी आणून शिंपणे घालीत होते.पाऊस पडू लागल्याने चेहऱ्यावर आनंदी दिसू लागलाआहे.एक महीन्यात ७५० मिलीमीटर पावसाची नोंद झालीअसून चौवीस तासात१४१ मिमि
नोंद झाली असल्याची माहीती तहसील मधून प्राप्त झाली आहे.येत्या दोन दिवसांत पावसाचाजोरवाढणार असल्याचाअंदाजभारतीय हवामानखात्यानेदिलाआहे. त्यामुळे शेतकरी लावणीच्या कामात गुंतला आहे. कोरोनाच्याव लाँकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती पुर्ण विस्कटून गेली आहेच तरी देखील परटेल खंडणूक करून भात लावणी करीत आहेत तर मुंबईतून आलेली मंडळी देखील मदतीसाठी सरसावले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.त्यामुळे शेतकरी राजा सह मोद व सर्व सुष्टी सुखावली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा