म्हसळा तालुक्यात सुमारे १२ कोटीचे अनुदान वाटप : २२कोटीचे पंचनामे पूर्ण
उर्वरीत अनुदान बँक खात्यांत जमा होणार
संजय खांबेटे : म्हसळा
3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यांतील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड, माणगाव,अलिबाग, या तालुक्याना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येथील बाधित नागरिकांसाठीशासनाकडून आणि विविध सामाजिक संस्थांचे स्तरावर मदत करण्यात येत आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने प्रति कुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ, रॉकेल ५ली. मोफत देण्यात आले.रायगडात लाखो घरांची फळबागायतींची पडझड झाली अनेक झाडे उन्मळून पडली. यानंतर 5 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हयात भेट देऊन नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने आणखी 301 कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे आता एकूण मदतीची रक्कम 373 कोटी झाली आहे. यापैकी 242 कोटी रुपयांची मदत ही उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी असल्याची माहिती त्याच वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व खासदार सुनिल लकरे यानी दिली होती.
म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाव वाडींत पूर्णतः घरे कोसळणे, अंशतः घरे पडणे, झोपडया पडणे , गुरांचे गोठे , दुकान टपरी पडणे असे अनेक प्रकार झाले.तालुक्यात अशा प्रकारच्या १५ हजार ५७९ दुर्धघटना घडल्या व त्यात ७ हजार ८३ लाभार्थांचे अपरीमीत नुकसान झाले.सुमारे रु २१ कोटी ९८ लक्ष २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे झाले एक जिवीत हानी,३१ मृत जनावरे, ३पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णतः पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंतः पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे,६३ दुकान टपऱ्या आहेत. तालुक्यातील काही अपद ग्रस्ताना रु ११ कोटी८७ लक्ष २०हजार २६१ चे अनुदान वितरीत झाले आसल्याचे महसुल विभागाने सांगितले .
तालुक्यात ९६अंगणवाडी ईमारती,६तलाठी कार्यालये,२२ माध्यमिक शाळा इमारती, १०२ प्राथमिक शाळा इमारती, ३७ ग्रामपंचायत कार्यालय, ५ जि.प.आरोग्य विभागाच्या इमारती, पंचायत समिती कार्यालय असे एकूण रु ८कोटी ७३ लक्ष५ हजार २१० चे शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.
तालुक्यांतील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हे.काजू ३८९.५ १हे.नारळ ५ ०.२०, हे, सुपारी २९.३१ हे इतर फळपिके ४६.५० हे बागायतीं क्षेत्रात नुकसान झाले आसल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले.
"फळपिकांसाठी शासन पूर्वी रू१८ हजार प्रति हेक्टरी नुकसान देत असे या वेळी निर्सग चक्रीवादळात बहुजन विकास अधाडी सरकार बागायत दाराना रू ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आसल्याचे समजते"
"तालुक्यातीलअपदग्रस्ताना रु ११ कोटी८७ लक्ष २०हजार २६१ चे अनुदान वितरीत झाले उर्वरीत अनुदान उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचीत रहाणार नाही"
शरद गोसावी, तहसीलदार म्हसळा.
إرسال تعليق