मी शिवसेनेच्या विरूध्द नक्कीच लढलो : पण 'या' परिस्थितीत मी अकसाने कधीच वागलो नाही. खा तटकरे शिवसेनेच्या टिकेला खरपूस उत्तर



मी शिवसेनेच्या विरूध्द नक्कीच लढलो : "निर्सगा" चे नैर्सगिक आपत्तीत मी अकसाने कधीच वागलो नाही. खासदार तटकरे
शिवसेनेच्या टिकेला खरपूस उत्तर
संजय खांबेटे : म्हसळा 
रायगडचे खासदार सुनिल तटकरे यानी निर्सग चक्रीवादळाचे निमित्ताने आज म्हसळा येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये कोव्हिड(१९) पासून निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, मंडणगड, दापोली या कोकणपट्टींतील भागाचे विविध प्रकारे झालेल्या नुकसानाचा व उपाययोजनांचाआढावा घेतला मार्च ते जून या वेळी कोरोना पासून आज पर्यंत पालक मंत्री अदीती तटकरे, आमदार अनिकेत भाई व मी स्वतः प्रशास नाजवळ प्रत्यक्ष व फोनवर कसा संर्पकात होतो याचे तारीख, वार, गाव, वाडयांची नांवे सांगत कामाचा पाढाच वाचला. निर्सग वादळाने सर्वात जास्त नुकसान विज वितरण कंपनीचे केले अधिक्षक अभियंता वाशी राजाराम माने,कार्यकारी
अभियंता आप्पा साहेब खांडेकर व त्यांचे सहकाऱ्यांचे खासदार तटकरे यानी यावेळी विशेष कौतुक केले.
या वेळी चर्चा करताना शिवसेनेनी रायगडच्या पालकमंत्री अदीती तटकरे याना बदलण्याची मागणी दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवगणे मुख्यमंत्र्यांकडे करणार आसल्याच्या केलेल्या विधानाकडे पत्रकारानी लक्ष वेधले असता तटकरे यानी मी अतिशय किरकोळ माणसांचे विधानाला उत्तर देत बसत नाही असे सांगत एकाच वेळी शिवसेना व कॉंग्रेसच्या टिकेवर झोड उठवली , मी शिवसेनेच्या विरुध्द लढलो परंतु शासकीय कामात राजकीय विरोध करत नाही जिल्ह्यातील निर्सग वादळात प्रत्येकाचे नुकसानीचे पंचनामे होणारच व निकषाप्रमाणे प्रत्येकाला नुकसान भरपाई देण्याचे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे स्पष्ट व पारदर्शक धोरण आहे. आम्ही तिघेही जिल्ह्यांत व मतदार संघात फिरताना जनतेचे हीत जपतो त्यामुळे आमचा वैधानिक आधिकार कोणीही हीराऊन घेऊ शकणार नाही असे ठणकाऊन सांगितले. दुपारी १२ वा. उठणारे आम्हाला काय शिकविणार असा सवाल करत
तटकरेनी राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसवर आभ्यासू टिका केली. महाविकास आघाडीत आम्ही महाडचे आमदार भरत शेठ गोगावले, महेंद्र दळवी याना सोबत घेऊन काम करीत असतो ,कमी ज्ञान असणाऱ्याना आम्ही कसे विचारणार असे सांगत जिल्हाप्रमुख अनिल नवगणेंचा खरपूस समाचार घेतला.
खासदार तटकरे यानी निर्सग वादळाचे पूर्व संधेला म्हणजे २जून पासून पालकमंत्री अदीती, आमदार अनिकेत भाई व माझा जिल्ह्यांतील बंदर व खाडी किनाऱ्या लगतच्या स्थलांतरा पासून आजपर्यंत कसा संबध आहे याबाबत आभ्यासू सांगितले.प्रत्येक कार्डधारकाला ( सफेद असो अगर पिवळे ) रॉकेल, अन्नधान्य मोफत देणे या निर्णयामध्ये कसा सहभाग होता हे स्पष्ट केले. नुकसानीचे व्ययक्तीक नुकसान, शेती व फळबागांचे नुकसान, शासकीय इमारती, जि.प. च्या इमारती, अनुदानीत विना अनुदानीत शिक्षण संस्था, ग्रामपंचायत इमारती, मदरसा, मंदीरे, समाज मंदीरे, वाचनालय,आमदार -खासदार निधीतून उभ्या राहीलेल्या इमारती , स्मशान शेडया सर्वांच्या नुकसानीची नोंद शासन करणार असून, प्रत्येक नुकसानीचा पंचनामा केला जाणार असून प्रत्येक योग्य लाभार्थाला नुकसान भरपाई देण्याचे धोरण शासनाचे आसल्याचे तटकरे यानी सांगितले.
निर्सगच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यासाठी आजपर्यंत २६ कोटी रुपये तहसीलदार म्हसळा यांजकडे वर्ग झाले आसल्याचे सांगतानाच आंबाफळबागायतीना नविन निकषा नुसार भरपाई मिळेल, पुर्नलागवडीसाठी व कलमे तीन वर्ष जगविण्यासाठी मनरेगा योजनेचा लाभ मिळणार आहे.नारळ सुपारी, तसेचकोळी बांधवाना मदतीचे नवीन निकषाची मागणी करण्यात येत असल्याचे तटकरे यानी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार शरद गोसावी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर सभापती श्रीमती उज्वला सावंत, माजी सभापती नाजीम हसवारे,विविध अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा