प्रतींनिधी म्हसळा लाईव्ह
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावाचे क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील अठ्ठावीस दिवसांपर्यंत हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा कालावधीला दि.15 मे 2020 रोजी 28 दिवस पूर्ण झाले असून या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही .
त्यामुळे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंधीत म्हणून जाहीर केलेले भोस्ते गावाचे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
إرسال تعليق