तळा किशोर पितळे
तळा तालुक्यातील शेनाटे गावी तीन कोरोना पाँझेटीव्ह रूग्ण सापडल्याने आणखीन रुग्णाची भर पडली आहे
मुंबई येथील बोरिवली येथुन गावाकडे परतलेल्या एका दांपत्याला नवरा(वय५०)पत्नी(वय ४४) आणि त्यांचा मुलगा वय(२९) कोरोनाची लागण झाल्याची माहीती आहे.दरम्यान शनिवारी चरई(बुद्रुक)येथील एका युवकाचा अहवाल कोरोना पाॅजेटीव्ह आला असताना त्याच दिवशी संध्याकाळी तीन रुग्णांची भर पडल्याने सध्या तळेवासियांनी सावध पवित्रा घेतला आहे.या चारही रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तळा तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा आता पाच वर पोचला असुन चिंता वाढली आहे.कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यानंतर शेनाटे येथील दांपत्य आणि त्यांचामुलगा यांची स्वॅब टेस्ट तपासणीसाठी शुक्रवारी(दि.२२)रोजी पाठविण्यात आली होती रविवारी(दि.२४)सायंकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असुन तीघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पुढीलआदेश मिळे पर्यंत सध्या या तीनही रुग्णांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
शेनाटे येथील दांपत्य (दि.१४) रोजी बोरिवली ते खारपाडा ईनोवा गाडीने आले त्यानंतर एक कि.मी. चालत प्रवास केला त्यानंतर खारपाडा ते इंदापुर ईको गाडीने प्रवास केला आहे त्यानंतर इंदापुर ते तळाटेम्पो ने प्रवास केला आहे.यादांपत्याचा मुलगा(दि.१३)मोटर सायकलने प्रवास करत तळा येथे आला त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता.दांपत्यांना इंदापुर ते तळा येथे आणण्यासाठी भानंग गावातील टेम्पो मालक चालक होता व मुलाच्या मोटरसायकलवर बसुन येणारा युवक हा देखील भानंग गावातील असल्याचे समजते. प्रशासनाने या तीघांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित सुरक्षा म्हणुन होम काॅरंटाईन करण्यात आले असुन घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगीतले आहे.मुंबईतून व उपनगरातून हाँटस्पाँट असणाऱ्या ठीकाणाहून तळा तालुक्यात २३ता.पर्यंत २१००० चाकरमानी गावाकडे आलेआहेत.त्यामुळे स्थानिकांंची चिंता वाढली आहे.
إرسال تعليق