दुर्र्घर आजाराला कंटाळुन वारळ येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या



(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ येथील 55 वर्षीय शेतकरी व शेतमजुराने दुर्धर आजाराला कंटाळुन गावातील सार्वजनिक इमारतीत नायलॉनच्या दोरीने गळफास लाऊनआत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की चंद्रकांत धर्मा टावरी , वय ५५ रा. वारळ, ता. म्हसळा हा शेतकरी मजूर मागील ६ महिन्या पासून आर्थिक चणचण व एका गंभीर आजाराने त्रस्त होता त्यामुळे त्याने या सर्वाला कंटाळून सार्वजनिक ठीकाणी श्री गुरुदत्त मंडळ , मोठी आळी समाजमंदिराचे बाहेर असलेल्या लाकडी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन रात्री आत्महत्या केली असल्याची घटना दिनांक 24/5/2020 रोजी रात्री 10-30 ते दिनांक 25/5/2020 रोजी दुपारी 2-30 चे दरम्यान घडली आहे.घटनेची खबर मयताचा मुलगा देवेंद्र चंद्रकांत टावरी वय वर्षे 25 याने पोलीस ठाण्यात दिल्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 8/2020 नोंद केली आहे.घटनेची खबर मयताचा मुलगा देवेंद्र चंद्रकांत टावरी वय वर्षे 25 याने पोलीस ठाण्यात दिल्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 8/2020 नोंद केली आहे या बाबत अधिक तपास सपोनि धनंजय पोरे यांचे मार्गदर्शन घेऊन पोलीस हवालदार संतोष चव्हाण करीत आहेत. सदर शेतकरी कोरोना लॉक डाऊन पासून उदर निर्वाहासाठी आर्थिक चणचणी मुळे जास्त त्रस्त झाला होता अशी चर्चा वारळ मध्ये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा