श्रीवर्धन शहर परिसरात स्वच्छता मोहीम


श्रीवर्धन 
रायगड जिल्ह्याला कोरोना चां विळखा दिवसागणिक घट्ट बसताना दिसतोय. श्रीवर्धन मध्ये दक्षिण रायगडात पहिला कोरो ना रुग्ण आढळला होता.  अशातच कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसागणिक फैलावू नये याकरिता श्रीवर्धन नगरपालिकेतील कोविड 19 सफाई कामगार योध्यांचे योगदान लाखमोलाचे ठरत आहे.
लॉकडाऊन मध्ये सारेच जन घरात बसून असताना मात्र कायम जनसेवेचा वसा घेऊन काम करणारे सफाई कामगार आपले कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावताना दिसत आहेत.  त्यामुळे कोविड 19 लढ्यात जीवाची बाजी लावून अविरत कष्ट घेणारे सफाई कामगार  खरे हिरो ठरलेत. स्वच्छ श्रीवर्धन, सुंदर श्रीवर्धनसाठी ठेकेदार अर्चना सर्व्हिसेसचे एक पाऊल पुढे राहिले आहे.  अर्चना सर्व्हिसेस आपल्या प्रत्येक कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता राखण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे.  मान्सूनपूर्वी येथील गटारे, नाले सफाई ची कामे युद्ध पातळीवर होत आहेत. आतापर्यंत 75 टक्के कामे आटपली असून शहरातील घणकचरा  नीटनेटक्या नियोजनाद्वारे  प्रकल्पा पर्यंत पोहचविण्याचे काम योग्य पद्धतीने होत असल्याचे आरोग्य सभापती बाळकृष्ण चाचले यांनी म्हटले आहे. याकामी नगरपालिका मुख्याधिकारी श्री मोरे व नगराध्यक्ष जितेंद्र सात नाक यांची मोलाची साथ लाभली आहे. श्रीवर्धन ची आन बान शान ठरलेल्या सफाई कामगारांच्या रूपातील कोविड योध्यांचे व अर्चना सर्विसचे सर्व स्तरातून कौतुक होतेय.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा