म्हसळयातील "त्या" महिलेचा स्वॅब टेस्ट कोरोना निगेटीव्ह : म्हसळा करांचे टेन्शन झाले कमी.



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
मे च्या पाहिल्या आठवडयापासून रायगड मधील चाकर मान्यानी मोठया प्रमाणात आपापल्या गावाकडे परतणे सुरू केले आहे, पायी नंतर खाजगी व आता प्रवाशी वहानाने गावाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे , त्यातच दि.१६ रोजी पनवेल खांदा कॉलनी येथून येणाऱ्या एका खारगाव कोळीवाडा येथील कुटुंबातील ६२ वर्षीय वृद्ध माहिलेला या प्रवासात मृत्यू झाल्याची घटना घडली, होम कॉरंटाईन असेलेल्या त्या महिलेचा प्रवासातच झालेला मृत्यूमुळे सारे म्हसळाकर भयभीत झाले असताना प्रशासनाने सदर माहिलेचा स्वॅब टेस्ट घेतला होता, त्या स्वॅब टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.खारगाव (बु ) येथील कोळी समाजातील ६२ वर्षीय मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने म्हसळा कर मिश्चिंत झाले. त्या मृत महीले सोबतच्या अन्य कॉरंटाईन असलेल्या नातलगांचे ही आज स्वॅब टेस्ट घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रवक्त्याने सांगितले. म्हसळा तालुक्यातील वाडी वस्तींवर मागील १०-१५ दिवसात अद्याप पर्यंत १७ ते २० हजार चाकरमानी मुंबई पुण्यावरून आले आहेत बहुतांश मंडळीना त्या-त्या गावांत कॉरंटाईन करण्यात आले आहेत. त्यानी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, मुंबई - पुणे व अन्य शहरांत असलेल्या याकरमान्यानी आवश्यकता नसेल तर खेडयाकडे येऊ नये , आपल्या घरातच रहा सुरक्षित रहा असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश मेहता यानी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा