रिक्षा, मिनीडोअर चालवायला परवानगी द्यावीसमीर शेडगे यांची मागणी


रोहा प्रतिनिधी

जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या वडापाव, रिक्षा-मिनीडोअर चालवून पोट भरणार्‍यांनाही लॉकडाऊनमध्ये व्यवसाय करण्याची सूट द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त अन्य काही दुकाने अटी शर्तीवर सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  लॉकडाऊनमुळे सर्वांचीच अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. अनेकांना दुसर्‍यांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत वडापाव, रिक्षा, मिनीडोअर यासह हातावर पोट असणार्‍यांनाही त्यांचा व्यवसाय करण्याची सूट द्यावी, अशी मागणी समीर शेडगे यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा