जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बाजारपेठांच्या ठखलेल्या वेळेत : म्हसळाकर करत आहेत बदल.


ग्राहकांचे विकेंद्रीकरण होण्यासाठी सकाळी ९ ते सायं.५ वाजेपर्यंत शासनाचे बाजारपेठ सुरु रहावी.

( म्हसळा प्रतिनिधी )
शासनाने दिलेल्या लॉक डाऊन ४ मधील नविन सूचनांनुसार म्हसळा शहरासह सर्व जिल्ह्यात सायं ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी असून अत्यावश्यक कामा शिवाय नागरीकानी घराबाहेर पडू नये असे स्पष्ट आदेश आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आधिपत्याखालील क्षेत्रात नगरपालीका व नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक व नव्याने आदेश दिल्याप्रमाणे दुकाने सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत सुरु ठेवावी असे जिल्हाधिकारी रायगड यांचे असे स्पष्ट आदेशअसताना म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपविभागीय अधिकारी , श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी व नंतर बंद ठेवावी असा निर्णय घेण्यात आला व तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. बैठकीला तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी मनोज उर्कीडे, सपोनी धनंजय पोरे, नगराध्यक्षा जयश्री कापरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, हिंदू- मुस्लीम समाजाचे अध्यक्ष व विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या वेळी फारुकभाई पेणकर व अन्य ग्राहक प्रतिनिधीनी ग्राहकांच्या खरेदीच्या वेळेत कमी जास्त करू नये अधिक वेळ असल्यास ग्राहकांची विभागणी होऊन सोशल डिस्टंसींगचे पालन होईल या आभ्यासू सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले व बैठकीत मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी असा घातक व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यानी ठरविलेल्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यातआला. मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताच तालुक्यातून तिव्र प्रतिसाद उमटू लागून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे अशा विविध प्रतिक्रिया तालुक्यातून येऊ लागल्या. 


उपविभागीय अधिकाऱ्यांचा कानावर हात तर म्हसळा प्रशासनाचा खुलासा  याबाबतचा निर्णय उपस्थितानी घेतला आम्ही जिल्हाधिका- ऱ्यांच्या निर्णयाचे पालन करणार आसल्याचे तहसीलदार, सपोनी व नगरपंचायत मुख्याधीकाऱ्यानी सांगितले. मात्र उपविभागीय अधिकारी ,श्रीवर्धन अमीत शेडगे यानी संबंधीत फोन अगर मेसेजला उत्तर देणे टाळले.





"म्हसळा आविभागीय अधिकारी, तालुका प्रशासन,कोव्हीड (१९)या राष्ट्रीय अपत्तीबाबत तालुक्यातील विविध राजकीय पक्ष , विविध संघटना, पत्रकार यांचा योग्य तो समन्वय साधणे आवश्यक असताना अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतात त्याच कारणाने, श्रीवर्धन व म्हसळ तालुक्यात कोरोना +रुग्णांमध्ये वाढ होत आहे या बाबत मा. मुख्यमंत्री यांजकडे संघटनेच्या माध्यमातून तक्रार करणार आहे" महादेव पाटील माजी सभापती व तालुका प्रमुख म्हसळा


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा