तळा तालुक्यात मुस्लिम बांधवांनी शुक्रवारची नमाज केली घरी अदा ; कोरोना पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनाला बांधवांची साथ.


तळा (किशोर पितळे)जगभरात कोरोना नावाच्या महामारीने हैदोस घातला असुन या संसर्गजन्य विषाणु रोगाने  संपुर्ण जग संकटात ओढला गेला आहे .या कोरोनाच्या पाश्वभुमिवर गर्दी करूनये,अशासरकारच्या आवाहनाला साथ देत तळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी दि.२७ मार्च २०२० रोजी शुक्रवारची सामुदायिक नमाज मशिदी मधे न करता आपल्या घरीच अदा केली. दरम्यानच्या काळात तालुक्यात पोलिस अधिकारी व सर्व स्टाफने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.कोरोनाचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार जनतेला घराबाहेर पडु नका, गर्दी  करू नका, वेळोवेळी आपले हात साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा ,खोकताना शिंकताना हातात रूमाल अथवा टिशु पेपर ठेवा. टिशु पेपरचा वापर केल्यावर तो व्यवस्थित डस्बीन मधे टाका अशा महत्वाच्या सुचना करित आहेत. देशावर या विषाणुमुळे आणीबाणीची वेळ आली आहे. ही कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सरकार ला सर्व नागरिकांची एकदिलाने साथ हवी आहे .यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे,गृहमंत्रीअनिलदेशमुख  वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन करित आहेत .या विषाणुचा फैलाव हा विशेष करून गर्दीमूळे होत असल्याने सरकारने गर्दी होऊ नये याबाबत अधिक खबरदारी बाळगत गृहखात्याला विशेष महत्वाच्या सुचना केल्या असल्याने गावागावातुन पोलीस या कामी सतर्क झाले आहेत. गर्दी होऊ नये म्हणून सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळे काही काळ बंद करून ठेवण्याच्या सुचना सरकारने केल्या आहेत.सरकारच्या या सुचनांचे पालन करित शुक्रवारी २७ मार्च ला तळा  तालुक्यातील तळा,मांदाड, रहाटाड, कुडे, मजगाव  आदी सर्वच गावात मुस्लिम वस्ती असलेने मुस्लिम बांधवांनी शुक्रवारची आपली सामुदायिक नमाज आपल्या घरीच अदा केली. या दीवशी तालुक्यातील मशिदीत मौलाना व अन्य चार जण अशा केवल पाचच व्यक्तींनी  नमाज अदा केली. इतर लोकांनी आपल्या घरी नमाज अदा केली.तळा व तालुक्यातील इतर मशिदित इतरवेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव शुक्रवारी नमाज अदा करीत असतात. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मशिद व परिसरात सन्नाटा जाणवत होता.कोरोना व्हायरस जात पात धर्म  बघून हल्ला करीत नाही म्हणून आपण सर्वांनी एकजूट होऊन त्यावर मात केली पाहिजे, ही मात आपण कशी करणार ? कारण शत्रू फार बलाढ्य आहे, सम्पूर्ण जगाने त्याच्या समोर गुडगे टेकले आहेत.या वास्तव वादी परीस्थितीचा विचार करून जमातऊहींदीन व 
श्रीवर्धन मदरसा धर्मगुरू आदेशानुसार व मौलाना सदर(ट्रस्टी)यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम बांधवानी घरीच नमाज अदा केली अशी माहिती डॉ.कुरूक्कर,नझीर पठाण,ईस्माईल पल्लवकर यांनी दिली.यामधून"सुज्ञास अघिक सांगणे न लगे "असा संदेश दिला जात असुन नागरीकांनी काळजी घेऊन कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे वारंवार सुचित करावेसे वाटते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा