संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. म्हसळा तालुक्यातील ३५६ कर्जदार शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, आज ४ दिवस उलटून केवळ ६१ टक्के कर्जदार शेतकर्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले असल्याचे म्हसळा तालुक्याचे नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यानी सांगितले. येत्या दोन तीन दिवसांत कर्ज खात्यावर रक्कम जमा होणार असल्याने कर्जदार शेतकऱ्यां च्यात आनंदाचे वातावरण आहे.
बँक निहाय प्रसीध्द झालेली खाती (कंसातील आकडे आधार प्रमाणीकरण झालेले शेतकरी )
रा.जि.म.स. बँक लि.म्हसळा १८०( १३४),
बँक ऑफ इंडिया म्हसळा ११७ (८१),
बँक ऑफ इंडिया मेंदडी ३८ (२),
बँक ऑफ इंडिया खामगाव ७ ( ०),
बँक ऑफ इंडिया, दिवेआगर३ ( ०),
बँक ऑफ इंडिया म्हाप्रळ१( ०),
स्टेट बँक ऑफ इंडिया आंबेत ७(१),
बँक ऑफ महाराष्ट्र, श्रीवर्धन१ (१),
युनीयन बॅंक, श्रीवर्धन१ (०),
आयडीबीआय बँक१(०)
म्हसळा तालुक्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत ११ बँकेच्या माध्यमातून अपलोड झालेली एकूण खाती ५२१ आहे, प्रसीध्द झालेली खाती ३५६ आहेत आधार प्रमाणीकरणाचे काम झालेली खाती २१७ आहेत.
म्हसळा तालुक्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत ११ बँकेच्या माध्यमातून अपलोड झालेली एकूण खाती ५२१ आहे, प्रसीध्द झालेली खाती ३५६ आहेत आधार प्रमाणीकरणाचे काम झालेली खाती २१७ आहेत.
"म. जो. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंर्तगत ज्या शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले आहे. त्यानी यादीतील नमूद विशिष्ठ क्रमांक, आधार कार्ड आणि बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपले. सरकार सेवा केन्द्र / बँक शाखात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे"
"मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब, मागच्या काळात शेतकऱ्याना कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं अगदी सुटसुटीत आहे बघा धन्यवाद साहेब"
महादेव भिकू पाटील, रा. निगडी, शेतकरी म्हसळा.
"महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २५ % शेतकरी कामानिमित्त मुंबईत असतात होळीच्या सुट्टीत शेतकरी गावी आल्यावर पूर्तता होईल, ई- सेवा केंद्राच्या समन्वयाने बँक अधिकाऱ्यानी शेतकऱ्यांपर्यंत समन्वय साधावा व आधार प्रमाणीकरण करून घेणे जरुरी आहे "
के.टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार म्हसळा.
إرسال تعليق