माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग सुमार दर्जाचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व ठेकेदारची मिली भगत.
तालुका प्रमुख महादेव पाटील उपोषणाच्या पवित्र्यात
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जळगाव ते दिघी पोर्ट' या नव्याने होणाऱ्या '७५३ एफ' राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात ठेकेदारानी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. म्हसळयाचे शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील व या विभागातील अनेकानी या कामाबाबत शासनाकडे तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिन गडकरी यांच्याकडे अनेक वेळा तक्रार केली होती. एमएसआरडीसी व ठेकेदाराकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील हे या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक सोमवार दिं.16 मार्च 2020 रोजी म्हसळा तहसीलदार कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत.या बाबतचे निवेदन पाटील यांनी तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले आहे.
माणगाव दिघी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 'एमएसआरडीसी' कडून तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग जळगाववरून औरंगाबाद आणि नगरकडून पुण्यात येतो. पुण्यात चांदणी चौक ते पौड हा १७ किलोमीटर रस्ता चौपदरी असणार असून, पौडपासून दिघी पोर्टपर्यंत तीनपदरी रस्ता मियोजीत आहे. पुण्यावरून कोकणाकडे आणि ताम्हिणी घाटात जाणाऱ्या पर्यटकांमुळे या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्या साठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे यामुळे हा रस्ता दर्जेदार, नियम व निकषा प्रमाणेच असावा असा महादेव पाटील यांचा आग्रह आहे.
माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात दिघी-वडवली फाटा-मेंदडी-म्हसळासाइर्-मोर्बा-माणगाव या सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुपदरीकरण व कॉंक्रीटीकरणाचे ३७३ कोटी रुपयांचे काम जे एम् म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीने घेतले आहे. दिघी पोर्ट येथून होणारी अवजड वाहतूक या रस्त्याने होणार असल्याने रस्ता मजबूत बनविणे हे प्रमुख उद्दीष्ट आहे. रस्त्याचे काम वेगाने सुरु असून रस्त्याचे काम काही ठिकाणी पूर्णत्वास गेले आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मर्यादा असली तरी हे काम अजून पूर्ण होण्यास काही कालावधी जाणार आहे. यामध्ये वडवली ते वेळास गावाच्या दरम्यान रस्त्याचे एक बाजूचे कॉंक्रीटीकरण झाले असून या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगापडल्या आहेत. त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची चर्चा असून काम झाल्या झाल्या अशी परिस्थिती होणार असेल तर रस्ता किती काळ टिकेल? असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाने याकडे लक्ष घालावे अशी मागणीही होत आहे. घाईने काम पूर्ण करण्याचे नादात अनेक भागात आवश्यकते पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या आहेत, एमएसआरडीसी ने रस्त्यालगतच्या जमीनीत शेतकऱ्याना Aproch रोड देणे आवश्यकता असताना शेतीत जाण्यासाठी रस्ता, शेतीतील पाणी काठण्यासााठी मार्ग ,शेतीत टाकलेले दगड, झाडे काढून देणे गरजेचे आहे, घोणसा,चिरगाव भागात वन विभागाच्या जमिनीत अतिक्रमण,३५ सेक्शन परवानगी नसताना झाडे तोडणे या सर्व तक्रारींकडे एमएसआरडीसी व ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिला असल्याचे पाटील यानी सांगितले.
रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा फोटो.
तालुका प्रमुख महादेव पाटील उपोषणाच्या पवित्र्यात
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जळगाव ते दिघी पोर्ट' या नव्याने होणाऱ्या '७५३ एफ' राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात ठेकेदारानी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. म्हसळयाचे शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील व या विभागातील अनेकानी या कामाबाबत शासनाकडे तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिन गडकरी यांच्याकडे अनेक वेळा तक्रार केली होती. एमएसआरडीसी व ठेकेदाराकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील हे या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक सोमवार दिं.16 मार्च 2020 रोजी म्हसळा तहसीलदार कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत.या बाबतचे निवेदन पाटील यांनी तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले आहे.
माणगाव दिघी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 'एमएसआरडीसी' कडून तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग जळगाववरून औरंगाबाद आणि नगरकडून पुण्यात येतो. पुण्यात चांदणी चौक ते पौड हा १७ किलोमीटर रस्ता चौपदरी असणार असून, पौडपासून दिघी पोर्टपर्यंत तीनपदरी रस्ता मियोजीत आहे. पुण्यावरून कोकणाकडे आणि ताम्हिणी घाटात जाणाऱ्या पर्यटकांमुळे या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्या साठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे यामुळे हा रस्ता दर्जेदार, नियम व निकषा प्रमाणेच असावा असा महादेव पाटील यांचा आग्रह आहे.
माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात दिघी-वडवली फाटा-मेंदडी-म्हसळासाइर्-मोर्बा
रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा फोटो.
إرسال تعليق