प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
नोवल कोरोना वायरस (कोविड-१९) ने संपूर्ण मानवजातीवर जागतिक स्तरावर जीवघेणा हल्ला केला आहे. हा हल्ला महाभयंकर असला तरी घाबरण्याचे कारण नाही. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात या संकटावरील उपाययोजनां म्हणून शासनाने १४४ कलम लागू केले आहे. नागरिकांनी आप - आपल्या घरात राहावे. बाहेर पडू नये. असे आवाहन केले आहे.
शासनाची ही उपाययोजना नागरिकांच्या संरक्षणाकरिता आणि करोनाला परतवून लावण्यासाठी असून तिचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सभासदांनी तसेच सहानुभूतीदारांनी शासनाच्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन व्हावे याकरिता सर्व जनतेत जागरुकता मोहीम चालवावी असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
إرسال تعليق