तटकरे कुटुंबीयांकडे हिम्मत असेल तर ठाकरे सरकार मधून अदितीचा राजीनामा घ्यावा मग शिवसेनेवर टीका करावी ; अनिल नवगणे


बाबू शिर्के : म्हसळा
संपुर्ण महाराष्ट्रात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना अनेक ठिकाणी शिवजयंती निमित्त जाण्याचा मला योग आला होता.आपल्या महाराजांच्या शिवजयंती कार्यक्रमास निमंत्रण असो किंवा नसो शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा शिकवणी नुसार आम्ही कुठेही जाणार.पण आम्हा शिवसैनिकांना शिवजयंती पासून रोखणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही असा इशारा शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकारांनजवळ वार्तालाप करताना म्हसळा तालुक्यातील साळवींडे येथील कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर देताना त्यांना दिला.म्हसळा तालुक्यातील शिवजयंती मिरवणुकीत मी आणी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर गेलो असता शिवसेना म्हसळा तालुका सहसंपर्क प्रमुख अनिल काप यांनी साळवींडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केला आहे.त्यावेळी आपण येऊन जावे असे आमंत्रण दिले.त्या अमंत्रणाला मान देऊन आम्ही तात्काळ त्याठिकाणी पोहचून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. आणी तेथून निघून जात असताना ग्रामस्थानी आम्हला बोलवून आमचा यथोचित सत्कार केला.आमच्या कडून जे सहकार्य ग्रामस्थांना लागेल ते आम्ही त्यांना देऊ असे अभिवचन देऊन तेथून आम्ही निघून गेलो.यामध्ये आमदार अनिकेत तटकरे यांना आमचा राग येण्याचा कारण काय ? तुम्ही आमदार असाल तर सगळी गावे तुम्ही विकत घेतली नाहीत.आम्हाला कोणत्याही गावात जाण्यास आपण रोखू शकत नाही.जर आमची आणी शिवसैनिकांची तुम्हाला एवढी ऍलर्जी असेल तर तटकरे कुटुंबीयांनी प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वादाने आपली बहीण आमदार अदिती तटकरे मंत्री झालेली आहे.आणी याच शिवसेनेच्या जोरावर आपण अनेक पदे भोगत आहात त्या अदिती तटकरे यांचा पहिला राजीनामा घ्यावा.आणी मग आमच्यावर टीका करावी असेही पुढे बोलताना अनिल नवगणे यांनी सांगितले.माझे वडील काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहेत. आम्ही शून्यातून आलेलो आहोत. तुम्ही कोणाला शून्याचा वर येऊनच दिले नाही.तुमच्या वडिलांनी म्हणजेच खासदार सुनील तटकरे यांनी आमदार अदिती तटकरे यांना मंत्री बनवण्यासाठी किती फेऱ्या मारल्या आणी तुम्हाला आमदार बनवण्यासाठी किती जणांच्या विनवण्या केल्या याचे भान तुम्ही ठेवा. जर राज्यात महाविकास आघाडी असताना आपण इकडे असेच वागत असणार तर आम्हाला आमचा पक्ष प्रिय आहे .होऊन जाऊदे काय व्हायचे आहे ते असा सज्जड इशारा सुद्धा अनिल नवगणे यांनी दिला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा