प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
लॉक डॉऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशांत विशेष सर्तक असतानाच तालुका व शहरातील जिवनावश्यक वस्तूंच्या दर वाढीवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आसल्याची मागणी म्हसळा प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष शशीकांत शिर्के यानी केली. शशीकांत शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रेस क्लबच्या सभेला जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, उदय कळस, महेश पवार, अंकुश गाणेकर, सुशिल यादव, अरुण जंगम, श्रीकांत बिरवाडकर , वैभव कळस उपस्थित होते. म्हसळा शहरांत व तालुक्यात महसुल, पोलीस, आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत असे प्रशासनाचे विविध भाग योग्य भूमिका बजावत असतानाच बाजारात जिवनावश्यक वस्तूंच्या दर सुमारे ३० % वाढत आहेत, मास्क, सॅमी टायझर या आवश्यक वस्तू जास्त दराने विकल्या जातात, काही वस्तू बाजारात . दुर्मिळ होत आहेत, प्रशासनामार्फत अत्यावश्यक निर्देश देणाऱ्या सूचना योग्य निकषाने दिल्या जात नाही चौका चौकांतून वाहन थांबवून सूचना स्पष्ट ऎकू येतील याचे भान राखले जात नसल्याची जाणिव प्रशासनाला देण्यात आली. यावेळी शासनाचे संकेत व नियमा प्रमाणे प्रेस क्लब रक्तदान शिबीराचे आयोजन करेल असे ठरले.
إرسال تعليق