संपूर्ण जगासह देशात व राज्यात धुमाकूळ घातलेल्या करोना व्हायरसने जगाचीच परिस्थिती बिकट केली असून परिस्थिती ठंप्प पडल्याचे दिसत आहे.
रायगड जिल्हा रेशनिंग रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने यावेळी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत धान्य दुकानदारांना महिन्याचा मिळणारा पाॅस रिबेट हा प्रतिक्विंटल १५० रूपये ईतका असतो त्यामुळे जिल्ह्यात १३६९ दुकानदारांना मिळणारा धान्याचा साठा ८००० मेट्रिक टन इतका आहे.
सबंध जिल्ह्यात एकूण दुकानदारांना मिळणारा रिबेट हा जवळपास एक कोटीहून अधिक असल्याने रायगड जिल्हा मुख्याधिकारी यांच्यामार्फत करोनाग्रस्त पिडीतांसाठी मुख्यमंन्त्री सहाय्यक निधीला १ कोटीहून अधिक रक्कम जमा करणार असल्याचे रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी रायगड जिल्हाधिकारी सौ. निधी चौधरी यांची भेट घेत जाहीर केला.
यावेळी रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, संघटनेचे कार्याध्यक्ष शेखरशेट देशमुख, अलिबाग तालुका दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंन्द्र पाटील, श्री आवास उपस्थित होते.
إرسال تعليق