● ग्रामपंचायत निवडणुकीत वडिलांना सरपंचपदी निवडुन आणता आले नाही ते अन्य तालुक्यातील गावांचा विकास काय करणार ?
शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखांचे नाव न घेता आमदार अनिकेत तटकरे यांनी लगावला टोला
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे सरकार गाववाडीत विकास करण्यासाठी सत्तेत बसले आहे. श्रीवर्धन म्हसळा तालुका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लोकपयोगी मोठ मोठी विकास कामे कार्यान्वीत आहेत असे असताना शिवसेनेचे पदाधिकारी गाववाडीत जावुन लोकांची मतमतांतरे करतात. तुम्हाला जनतेला विकास देता आला नाही म्हणूनच जनतेने निवडणुकीत नाकारले. आता राज्यात आघाडीचे सरकार आहे खासदार, राज्यमंत्री आणि आमदार पदी लोकप्रतिनिधीत्व करताना आम्ही या भागात गतिमान विकास करण्यासाठी बांधील असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील साळवींडे बागाचीवाडी येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उदघाटन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी आमदार तटकरे यांनी दक्षिण रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांचे नाव न घेता ज्यांना आपले गावाचे ग्रामपंचायतीमध्ये वडिलांना सरपंच पदावर निवडुन आणता आले नाही ते येथे येवुन गावांचा विकास काय करणार असाही टोला लगावला. आमदारांचे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत साळवींडे बागाची वाडीत सुबक आणि भव्य उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उदघाटन आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते दि.14 मार्च रोजी करण्यात आले.
या वेळी संपन्न कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील,सभापती उज्वला सावंत,माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले,जेष्ठनेते अंकुश खडस, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, संतोष सावंत, सरपंच सोनल घोले, उपसरपंच लक्ष्मण कांबळे, शांताराम घोले, माजी सरपंच देवेंद्र डाऊल, रामशेठ डाऊल, गाव अध्यक्ष रवी जोशी, उमेश,निलेश पारदुले,रावजी जोशी, महिला अध्यक्षा रोशनी फटकरे,पुर्वी मोरे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिकेत तटकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की विद्यमान खासदार सुनिल तटकरे साहेबांनी केलेल्या लोकपयोगी विकास कामांचे बळावर श्रीवर्धन मतदारसंघात 1962 नंतर प्रथमच आदीतीताई 38783 मतांची लीड घेवुन पहिल्या महिला आमदार निवडुन आल्या. एवढ्यावरच न थांबता त्याना महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारमध्ये विविध खात्याचे राज्यमंत्री आणि रायगड जिल्हा पालकमंत्री पदाची जबादारी मिळाली आहे त्या मुले म्हसळा तालुक्यातील गावागावात गतिमान विकास होणार आहे असे आश्वाशीत करताना साळवींडे गावातील ग्रामस्थांनी मागणी केले नुसार गाव अंतर्गत रस्ता, महिला कार्यशाळा, सभामंडप आदी विकास कामांना वर्षभरात निधीची उपलब्धता करून दिली जाईल असे वचन दिले. कार्यक्रमाला लेप सरपंच अंकुश खडस यांनी मौलिक मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते तटकरे परिवाराचे पाठीमागे खंबीर आसुन जे कार्यरत आहेत ते खंबीर आहेत जे अन्य पक्षातून येतात आणि निवडणूक कालावधीत परत जातात ते सेटलमेंट वाले असतात असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच देवेंद्र डाऊल यांनी केले.
إرسال تعليق