स्वत:चे नातेवाईक परदेशातून आले असल्यास
डॉक्टरांनी स्वत:सह त्यांनाही होम क्वॉरनटाईन करावे -- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी
अलिबाग : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी खाजगी दवाखाने सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी,असे आदेश पारित केले आहेत.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामधील ज्या डॉक्टरांच्या कुटुंबातील व्यक्ती, मुलगा-मुलगी किंवा इतर नातेवाईक प्रदेशातून प्रवास करून आलेले असतील व ते एकाच घरात राहत असतील तर त्या डॉक्टरांनीही स्वतःला तसेच त्यांच्या परदेशातून आलेल्या इतर व्यक्तींनीही 14 दिवस अलग राहणे म्हणजेच होम क्वॉरनटाईन करून घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.
إرسال تعليق