म्हसळा शहरांत लॉक डाऊन : कोरोनाचे प्रतिबंधासाठी बाजार बंद

म्हसळा शहरांत लॉक डाऊन : कोरोनाचे प्रतिबंधासाठी बाजार बंद
आरोग्य विषयक सावधानतेचा प्रश्न वाऱ्यावर.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
शनिवारी पासून पुढील ३१ मार्च पर्यंत म्हसळा तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आता हॉटेल, बार आणि टपऱ्या बंद करण्यात आल्या,किराणा, मेडीकल, दुग्ध व्यवसायीक , भाजीपाला विक्रेते हे व्यवसायीक व सार्वजनिक प्रवासी व खाजगी प्रवासी मिनीडोअर रिक्षा वाहतुक सोडून बहुतांश व्यापाऱ्याना कोरोनाचे प्रतिबंधा साठी बंद ठेवण्याचे निर्देश तालुका महसुल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने दिल्याने आज म्हसळा शहरांत बहुतांश व्यवहार ठप्प होते. प्रशासनाचा जनतेशी योग्य संवाद नसल्याने आज दुपारपर्यंत किराणा व्यवसायीकांच्या दुकानातून ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहकानी गर्दी केली होती.
    रविवारी दि. २२ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचा कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी सर्वांनी घराबाहेर पडूच नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने विविध माध्यमातून जनतेला दिले असल्याने आज किराणा माल भरण्यासाठी बाजारांत प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी होती.

ग्रामीण वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लाल परी अर्थात एसटीत करोनाच्या पार्श्वभूमीवर एक सीट एक प्रवासी अशी सुविधा व काळजी घेत असतानाही ग्रामिण भागातील प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतुकीच्या मिनी डोअर, ऑटो रिक्षाची विशेष पसंती करतात.

"म्हसळा बाजारपेठेतील दुकाने किती दिवस बंद रहाणार ह्या गोष्टी आमच्या गावांत योग्य तऱ्हने कळल्या नसल्याने आम्ही मंडळी आज घाईने किराणा घेण्यासाठी आलो."
महीला ग्राहक.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा