लॉक डाऊनमध्ये फ्रि होम डिलेवरी सर्विस पत्रकार निकेश कोकचा यांचा स्तुत्य उपक्रम

टीम म्हसळा लाइव्ह

कोरोना विषाणू मुळे संपुर्ण भारत लॉक डाऊन झाला आहे.शहरी भागातील नागरीकांना जिवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध होताना दिसत आहेत, मात्र एसटी बंद मुळे ग्रामिण भागातील नागरीकांचे हाल होत आहेत.१०० रुपयांच्या सामानासाठी ५०० रु रिटर्नचे भाडे प्रायव्हेट गाडी वाल्याना दयावे लागत आहेत.पैसे नसतील तर डोक्यावर ओझे घेऊन १० किलोमिटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
ग्रामिण भागातील नागरीकांना घरी बसल्या किराणा / धान्याची अत्यावश्यक सुविधा मिळावी म्हणून म्हसळा येथील युवा पत्रकार निकेश कोकचा व त्यांचे सहकारी चेतन जैन,ललित जैन यांनी फ्रि होम डिलेवरी सर्विस सुरु केली आहे. या अंतर्गत कोकबल दुर्गम गावाचा सामान फ्रि मध्ये घरपोच केला.
त्याच प्रमाणे वडघर पांगलोली येथिल मध्यल्या आळीतील सर्व घरांमध्ये भाजीपाला संपला होता या गावातील एका ग्रामस्थाने कोकचा यांना संपर्क केल्यानंतर तब्बल १२० किलो भाजीपाल्याची गावात फ्रि डिलेवरी केली. यावेळी चेतन जैन देखील उपस्थित होते.
या उपक्रमाचे म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कौतुक केले असून निकेश कोकचा यांचे आभार व्यक्त केले .



Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा