तळा येथे श्री सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान.

तळा(किशोरपितळे)
रायगड जिल्हा स्वच्छतादूत राज्य पुरस्कार प्राप्त डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे  तळा येथे  दि.१मार्च रोजी आदरणीय सचिनदादा  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येते त्या अनुषंगाने तळा येथे सकाळी ७.३० वाजता जमलेल्या श्री सदस्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे गटा-गटाने नगरपंचायत कार्यालय, तळा बस स्थानक, बाजारपेठ,मोहल्ला, उर्दु शाळा,तहसील परिसर,कुंभार आली,चंडिका मंदिर रस्ता, रामेश्वर मंदिर रस्ता आदी ठिकाणांची स्वच्छता केली.या स्वच्छता अभियानात तहसीलदारए.एम.कनशेट्टी,तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मामुंढे,उपनगराध्यक्षा सायलीखातू,नगर सेवक विठोबाचांडीवकर नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच तळा, वाली,तळेगाव,रहाटाड,कुडा बैठकीतील श्री सदस्य सहभागी झाले होते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा