म्हसळयात गुटखा पाठोपाठ काळ्या गूळावर कारवाई : रु५२ हजारचा ऐवज जप्त.

   म्हसळा पोलीसानी केलेली कारवाई संग्रहीत छाया

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारा काळा गूळ आणि नवसागरची विक्री म्हसळातालुक्यात सुरू आहे. यात बेकायदा मद्यप्राशन करणारी पिढी वाढत असल्याचे चित्र आहे. या साऱ्या प्रकाराला रोखण्यासाठी म्हसळा पोलीसानी कठोर पावले उचलत किराणा व्यापारी फरीद अब्दुल मेमन यांच्यावर कारवाई करून MH06 BG 523 हा मिनीडोअर टेंपो व ५० नग काळया गुळाचे खडे एकूण रु ५२ हजार१00 रुपयेचा माल जप्त केला.सपोनी धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत हे.कॉ.एस.बी. मोरे., संतोष चव्हाण यांचा सहभाग होता.
"पोलिसांचे समन्वयक म्हणून गावोगावी पोलीस पाटील कार्यरत आहेत. गावातील तंटे तसेच अवैध धंद्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोचविण्यासाठी पोलीस पाटलांची महत्त्वाची भूमिका असते."

"काळा गूळ आणि नवसागर विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. तरीही शहरी भाग व गावागावांत किराणा दुकानांमध्ये काळ्या गुळाची विक्री होताना दिसत आहे. ग्रामीण भागात गावठी दारू बनवून ती विकली जाते. मात्र पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या गावठी अवैध दारू विक्री मुळे ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. तरुण वर्गात गावठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल येथील काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
गाव पातळीवरील महिला मंडळांनी याबाबत रितसर तक्रारी पोलीस ठाण्यात कराव्यात, त्यांची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल."
धनंजय पोरे, सपोनी म्हसळा पो. स्टेशन.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा