कोरोना पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील जत्रोत्सव, धार्मिक कार्यक्रमरद्द,लग्न सोहळे स्थगीत : सरकारच्या आवाहनाला साथ.

तळा (किशोर पितळे)
जगभरात कोरोना नावाच्या महामारीने हैदोस घातला असुन या संसर्गजन्य विषाणु रोगाने  संपुर्ण जग संकटात ओढला गेला आहे .या कोरोनाच्या पाश्वभुमिवर गर्दी करू नये, अशा सरकारच्या आवाहनाला साथ देत तळा तालुक्यातील सर्व जत्रोत्सव रद्द करण्याचा महत्त्वपुर्ण घेण्यात आला आहे तळा शहरातील श्रीराम मंदिर कुरूंडा,श्रीदेशमुख कुटुंबातील श्रीराम जन्मोत्सव अगदी साध्या पध्दतीने घरातल्या घरात केलाजाणारआहे.श्री बापुजी देव कुंभारवाडा वश्री डोणोबा (द्रोणागिरी) मालाठेवाडी मालाठे येथील काठी वश्री.गावदेवी चंडीकेची बळीची काठी कार्यक्रम रद्द करण्यात आलाआहे.अशी माहिती श्री चंडीकादेवी ट्रस्ट कडून समजते तसेच रोवळा,मालाठे,गिरणे, निगुडशेत,पन्हेळी,महागांव, मांदाड, वाशी गावांतील जत्रा प्रथेप्रमाणे होत होत्या त्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती गाव अध्यक्ष ग्रामस्थ पोलीस पाटील यांच्या कडून समजते कोरोनाचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेउन केंद्र व राज्य सरकार जनतेला कोरोना हा जिवघेणा विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवाहन व उपाय योजना राबवून जनजागृती करीत आहे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे गृहमंत्री अनिल देशमुख वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन करित आहेत.तसेच महसूल विभाग,पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन,उप विभागीय अधिकारी(प्रांत)कडक अमंलबजावणी करीत आहेत या विषाणुचा फैलाव हा विशेष करून गर्दीत संपर्कात होत असल्याने सरकारने गर्दी होऊ नये याबाबत अधिक खबरदारी बाळगत गृहखात्याला विशेष महत्वाच्या सुचना केल्याअसल्यानेगावागावातुन पोलीस या कामी सतर्क झाले आहेत. गर्दी होऊ नये म्हणून सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळे काही काळ बंद करून ठेवण्याच्या सुचना सरकारने केल्या आहेत.त्या मुळे भक्तांमुळे मंदिरे ओस पडली आहेत.व उत्सव सण सार्वजनिक समारंभ रद्द केले असूनया धर्तीवर घरगुती धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळा, साखरपुडा, बैठकांंना स्थगिती दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णदेशातलाँटडाऊनकरण्यातआलाआहे.जेणेकरून यासंसर्गजन्यरोगाची लागण होऊनयेम्हणूनसरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहे.या कोरोना विषाणूजन्य संसर्ग रोगाने सम्पूर्ण जगाने त्याच्या समोर गुढगे टेकलेआहेत.या विषाणुचा फैलाव हा विशेष करून गर्दीमूळे होत असल्याने सरकारने गर्दी होऊ नये घराबाहेर पडु नका,गर्दी करू नका, वेळोवेळी आपले हातसाबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा ,खोकताना,शिंकताना हातात रूमाल अथवा टिशु पेपर ठेवा. टिशु पेपरचा वापर केल्यावर तो व्यवस्थित डसबिन मधेटाका.काळजी घ्या.घाबरून जाऊ नका अशा महत्वाच्या सुचना करित आहेत. देशावर या विषाणुमुळे आणीबाणीची वेळ आली आहे.ही कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सरकारला सर्व नागरिकांची एकदिलाने साथ देेत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा