आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक


टीम म्हसळा लाईव्ह

जे.जे. समूह रुग्णालयांतर्गत सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे करोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख  यांनी  दिली.त्याच प्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयू असेल. त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५०  खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५०  खाटांच्या आयसीयूची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र ७०० खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी १०० खाटा आयसीयूसाठी असतील असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा