मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी "आम्ही तंत्रस्नेही शिक्षक" समूहाने चाचणी निर्मिती करून चाचणी सोडविल्यानंतर ऑटोमेटीक प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी सुरज कुदळे (नाशिक), भालचंद्र भोळे (ठाणे) यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असून विशाल पाटील (नंदुरबार) व श्यामसुरेश गिरी (लातूर) यांनी प्रश्ननिर्मिती करून चाचणी समिती सदस्यांकडून प्रश्नांची व अचूक उत्तरांची योग्य तपासणी करून चाचणीही घेण्यात आली आहे. ऑटोमेटीक प्रमाणपत्रांना मर्यादा असल्यामुळे दोनशे जणांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व कोरोना जनजागृतीसाठी लिंक १४ एप्रिल २०२० पर्यंत खुली ठेवण्यात आली आहे.
सदर उपक्रमासाठी प्रकाश चर्हाटे व वीणा सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे समुहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली खाड्ये सांगतात.
लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात व शैक्षणिक उपक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी समुहाचे प्रशासक व सदस्यांनी इयत्ता व विषयनिहाय पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा चाचण्या तयार कराव्यात असे आवाहन वृषाली खाड्ये यांनी केले होते. त्यांनी स्वतःही पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी चाचण्या बनवल्या आहेत. जयराम चव्हाण (नाशिक), राजेश चायंदे (अमरावती) या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.
गजानन पुंडे (बुलढाणा), श्यामसुरेश गिरी (लातूर), संदीप सोनार (जळगाव), विशाल पाटील (नंदुरबार), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), सुनिता अनभुले (मुंबई), साईली राणे (मुंबई), ज्योती दुर्गे (पुणे), प्रकाश जाधव (लांजा), कौसर खान (मुंबई), ए.आर. गिरी (भंडारा), इला मिस्त्री (मुंबई), राजकुमार महादेव केदार, अंजली ठाकुर (यवतमाळ), गोरखनाथ वंजारी (भंडारा), ज्ञानेश्वर नामदेव पाटील (नंदुरबार), सतीश दुवावार (चंद्रपूर), कमलेश चर्डे (यवतमाळ) यांनी ऑनलाईन चाचण्या तयार केलेल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूपच फायदा होत आहे.
إرسال تعليق