राजिप प्राथमिक शाळा-तिघर येथे कोरोना व्हायरस जनजागृती अंतर्गत मास्क बनविणे कार्येशाळा संपन्न


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
नोव्हेल कोरोना विषाणूची लागण देशातील तसेच महाराष्ट्रातील काही भागात झाल्याचे आपणास माहिती आहेच. या विषाणूची लागण रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
     नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यां मध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. यामध्ये वारंवार हात धुणे ,शिंकताना व खोकतांना रुमालाचा वापर करणे किंवा मास्क घालणे , आजारी असतांना शाळेत येणे टाळणे , गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे , वारंवार तोंड , डोळे व नाक यांना हात न लावणे. ताप , सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्ती पासून 1 मीटर दूर राहावे . गरज असल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात भेट देणे.ह्या बाबी कोरोना आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.आज पर्यंतचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात 17 व्यक्ती कोरोना बाधित आहेत.त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या व्हायरस वर अजून लास तयार झाली नाही.या वर उपाय म्हणजे काळजी घेणे होय. वरील गोष्टीं माहीत असलेला विद्यार्थी वर्ग त्यांच्या कुटुंबात व समाजात जनजागृती करू शकतो .
म्हणूनच आमच्या तिघर शाळेत कोरोना व्हायरस यावर जनजागृती करण्यात आली .या मध्ये शाळेतील खडे मॅडम व अहिरराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मास्क बविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले .विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकानी स्वतः मास्क तयार केले.
मास्क बनविण्यासाठी लागणारे  साहित्य जसे सुती कापड , सुई , दोरा , विलाष्टीक इत्यादी बाजारातून आणून मास्क बनविले. या मास्कचा उपयोग गर्दीच्या ठिकाणी आपण करू शकतो.
या कार्येशाळेसाठी भिसेगाव केंद्राच्या केंद्र प्रमुखा सौ.नलिनी शरद साळोखे , तिघर शाळेचे मुख्याध्यापक श्री.ईश्वर भगवान इंगळे सर , विषय शिक्षिका सौ. सविता अशोक खडे मॅडम , उपशिक्षिका सौ.योगिता सुनील अहिरराव मॅडम , उपशिक्षिक श्री.जनार्धन उमाजी पजई सर,यांनी खूप मेहनत घेतली .या कार्येशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा