प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आपल्या देशा मध्ये व राज्या मध्ये "कोरोना" महामारीचे संकट अधिक तीव्र होत आहे व त्याचा प्रादुर्भाव हि झपाट्याने वाढत आहे. त्याच अनुषंगाने आमदार अनिकेत तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवण्याबाबत पत्र लिहिले आहे.
रायगड जिल्यातील रोहा , महाड व इतर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या अजूनही चालू आहेत तरी "कोरोना" महामारीचे संकट व प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्यातील रोहा , महाड व इतर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या लवकरात लवकर बंद करण्याचे निर्देश संबधितांना होणे गरजेचे आहे असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे...
إرسال تعليق