म्हसळा ग्रामिण रुग्णालय कोरोना पासून कसे करणार रक्षण : प्रातिनियुक्तीवर पदांचे होत आहे भक्षण.


म्हसळा ग्रामिण रुग्णालय कोरोना पासून कसे करणार रक्षण: प्रातिनियुक्तीवर पदांचे होत आहे भक्षण.
म्हसळा रुग्णालयातील कर्मचारी व कॉट प्रतिनियुक्तीवर

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरात ग्रामिण रुग्णालय असून नसल्या सारखेच आसल्याची आजची स्थिती आहे.ग्रामिण रुग्णालय मिळाले .३० खाटाचे व सुमारे रु २ कोटी खर्च केलेल्या हया ग्रामिण रुग्णालयाचे उद्घाटन २५ मे २०१४ ला झाले, आज तब्बल ६ वर्ष झाली तरी म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी आधिक्षक अगर वैद्यकिय अधिकारी शासन देऊ शकले नाही हे म्हसळा करांचे दुर्देव का शासन करीत आहे  राजकारण हा प्रश्न म्हसळा कराना पडला आहे. ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी अधिक्षक अगर वैद्यकिय अधिकारी नसल्याने ग्रामिण रुग्णालयात अद्यापही रुग्णाना परिपूर्ण सेवा व सुविधा मिळत नाही.
पदांचा अभाव कसा लागणार आरोग्याचा निभाव
महच्वाची पदे रिक्त वैद्यकिय अधिक्षक , कनिष्ठ लिपीक दोन पदे मंजुर आहेत त्यापैकी एक पनवेल येथे तर दुसरा श्रीवर्धन येथे प्रतिनियुक्तीवर आहे. अधिपरिचारिका वर्ग३ची ७ पदे मंजुर आहेत त्यापैकी १ पनवेल येथे प्रतिनियुक्तीवर तर अन्य तीन रजेवर आसल्याचे सांगण्यात येते. सध्या रुग्णालयात केवळ दोन अधिपरिचारिका (सिस्टर)कार्यरत आहेत. औषध निर्माण अधिकारी १ पद असुन मागील सहा वर्षापासून प्रातिनियुक्तीवर माणगाव येथे कार्यरत आहे. प्रयोगशाळा सहाय्यक वर्ग ३ हे पद गेले ६ वर्षात भरलेच नाही, कक्ष सेवक ४ पदे असुन ३पदे रिक्त आहेत, रुग्णालयासाठी आवश्यक असणारा Deta Entery Operetor अद्यापही नाही.
ग्रामिण रुग्णालय असुविधांचे माहेर घर.
ग्रामिण रुग्णालय सुरू झाल्याबरोबर रुग्ण कल्याण समिती स्थापन होणे आवश्यक असताना अद्यापही रुग्ण कल्याण समिती नेमलीच नसल्याचे सांगण्यात येते.ग्रामिण रुग्णालयाची १०८ अॅम्ब्युलन्स मागील दीड महिने बंद आहे, ग्रामिण रुग्णालय सुरू झाल्यापासून मागील ६ वर्षात १०२ अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही, रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थीएटर नाही, ३० खाटाचे ग्रामिण रुग्णालयातून विविध कर्मचाऱ्यां प्रमाणेच १० खाटा प्रतिकामगिरीवर माणगावला पाठविल्याची माहीती पुढे येत आहे.रुग्णालया साठी व्हेंटीलेटर, एक्स रे मशीन, A.C,ऑक्सिजन री जनरेटर, निर्जुतुकीकरण मशीन या गोष्टी प्राधान्याने गरजेच्या आहेत.


"म्हसळा ग्रामिण रुग्णालय हे म्हसळा-तळा व श्रीवर्धन तालुक्यांतील ११० गावाना अंत्यत मध्यवर्ती आहे , या रुग्णालयाला पुरेसा कर्मचारी वर्ग,अॅम्ब्युलन्स शासनाने तात्काळ देणे आवश्यक आहे. रुग्णालयाचे बांधकाम काँग्रेस- राष्ट्रवादी असताना सुरु झाले, उद्घाटन त्याच वेळी झाले, भाजपा -शिवसेना युतीच्या काळात कार्यरत झाले. आता महावीकास आघाडी पूर्णपणे लक्ष घालून परिपूर्णरित्या सुरु व्हावे ही म्हसळा करांची अपेक्षा"
महादेव पाटील,माजी सभापती तथा तालुका प्रमुख शिवसेना म्हसळा.

"रुग्णालयासाठी व्हेंटीलेटर, एक्स रे मशीन, A.C,ऑक्सिजन री जनरेटर, निर्जुतुकीकरण मशीन या गोष्टी प्राधान्याने आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकीत्सक अथवा अधिक्षकानी कचऱ्यासाठी मशीन घेण्यासाठी व ते बंद ठेवण्याची घाई कशासाठी? कॉट माणगावला का पाठविल्या , जिल्हा शल्यचिकत्सकांच्या कारभाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
अनिकेत पानसरे, शहर प्रमुख, शिवसेना, म्हसळा.


"म्हसळा ग्रामिण रुग्णालयातील समस्यांबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद गवई ,यांचे मोबाईलवर संपर्क साधला असता सतत नो रिप्लाय येत होता"

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा