श्रीवर्धन समुद्र किनारी वणवा ; केतकी व सुरुची शेकडो झाडे वाचली


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या केतकी व सुरुच्या वनात अचानक वणवा पेटला त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोळ निर्माण झाले .अग्नीने रुद्ररुप धारण केल्याचे काही तरुणांच्या निदर्शनांस आले .श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या  दांडा दक्षिण विभागाच्या बाजूने अग्नी व धुरांचे लोळ सावन तवसाळकर व अंकित पाटील यांना दिसले .त्या वेळी त्यांनी सदरची वार्ता नगरसेवक अनंत गुरव यांना सांगितली त्यांनी  नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळवली .तो पर्यंत घटनास्थळी महेंद्र पोलेकर , सावन तवसाळकर व अंकित पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले  .अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली .तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शेकडो केतकी , व सुरुच्या झाडांचे प्राण वाचले .सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट असतो अन्यथा श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील सूरू व केतकी चे  बन पर्यटकांना सदैव आकर्षित करतात .श्रीवर्धन मधील पर्यटनास चालना देण्यासाठी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे .केतकी , सुरू व इतर विविध जातीची झाडे समुद्र किनाऱ्यावर अनेक वर्षांपासून आहेत . समुद्राची धूप थांबवण्यासाठी  धुपप्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यात आला आहे .जीवना कोळीवाडा ते दांडा दक्षिण विभाग या समुद्र किनाऱ्यावर सगळी कडे सुरुची गर्द झाडी निदर्शनांस येते त्यामुळे लागलेला वणवा तात्काळ नियंत्रणास आल्याने जवळपास 03 किमी  अंतर असलेले विविध झाडे व झुडपे अग्नीच्या भक्ष्य स्थानी पडण्यापासून वाचली आहेत .

मी व माझा मित्र  अंकित पाटील समुद्र किनारी होतो त्या वेळी अचानक आमच्या किनाऱ्या जवळील झाडांना आग लागल्याचे निदर्शनांस आले .त्या वेळी आम्ही तात्काळ नगरपालिकेला कळवले त्या मुळें लवकर आग विझवण्यात यश आले .त्यामुळे असंख्य झाडे जळण्यापासून वाचली ......सावन तवसाळकर प्रत्यक्षदर्शी तरुण 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा