तळा. (किशोरपितळे)
द.ग.तटकरे कला वाणिज्य महाविद्यालय तळा येथे पदवी प्रदान समारंभ २९ फेब्रुवारी रोजीआयोजित करण्यात आला होतासदर कार्यक्रम महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.श्रीनिवास वेदक यांचे अध्यक्षतेखाली झाला.व्यासपीठावर अध्यक्ष तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रकांत रोडे ,सचिव मंगेश देशमुख, सभापती महिला बाल कल्याण रायगड जि प गीता जाधव, सभापती देवकी लासे, जि.प.सद्स्य बबन चाचले, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, प्राचार्य कैलास निंबाळकर,गो म वेदक विद्यामंदिर चेअरमन महेंद्र कजबजे, माजी समाजकल्याण सभापती हिराचंद तांबे, अॅड.उत्तम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रथम विद्यार्थ्यांना खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले कि माझ्या तळा तालुक्यातून एखादा विद्यार्थी एम पी एस सी, यु.पी.एस.सी. परीक्षेतून उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेतअधिकारी व्हावेत व पदवी प्रदानाचा योग प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात घडावा असे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले म्हणाले की द.ग.तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीप्रदान प्रमाणपत्र प्रदान माझ्या हातून होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.कारण माझ्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याचे व शिक्षणात प्रगती होत असल्याचे पहावयास मिळत आहेआज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवीतून जीवन घडण्याची सुरूवात होत आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पद्धती शिक्षणाची आवड ग्रामीण भागापर्यंत पालकांच्या मनामध्ये आली आहे म्हणून खेड्यापाड्यातील जन्माला आलेल्या मुली मुले पदवीपर्यंत शिक्षण घेतात ते पदवीघेतात उद्या जीवनात भविष्यात त्याचा उपयोग काय करायचं याचा विचार देखील करतात येथे पदवी प्रमाणपत्र देत असताना एका पदवीप्रदान भगीनीला विचारले तू पुढील विचार काय करणार आहेस तेव्हा ती म्हणाली की मी एम पी एस सी चा अभ्यास करणार आहे म्हणजे पुढील भविष्याचे उत्तम अधिकारी या कॉलेज मध्ये व परिसरात पाहावयास मिळतील
कोकणातील महाराष्ट्रातील विद्यार्थी युपीएससी एमपीएससी चे तसेच कला क्रीडा क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी दूरवर जात असतात अशा विद्यार्थ्यांना जे आवश्यक लागेल ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.आणि तळा तालुक्यातून पदवीनंतर एमपीएससी युपीएससी परीक्षेतून विद्यार्थी उत्तीर्ण होऊन अधिकारी घडावेत व विविध क्षेत्रातील शिक्षणात नेहमीच येथील विद्यार्थी यश प्राप्त करतील अशा शुभेच्छा व्यक्त केल्या
إرسال تعليق