शनिवार पासून 31 तारखे पर्यन्त म्हसळा बाजारपेठ बंद:बंदचे उल्लंघन केल्यास जावे लागणार तुरुंगात:नागरिकांच्या सुरक्षितेसाठी नगराध्यक्षांचा निर्णय
म्हसळा(निकेश कोकचा)
घातक कोरोनो विषाणूंपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी म्हसळा नगरपंचायती तर्फे खबरदारची पाऊल उचलण्यात आला असून, म्हसळा बाजारपेठ शनिवार पासून 31 मार्च पर्यन्त बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बंदचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होऊन तुरुंगात ही जावे लागू शकते.
या बंद मधून अत्यावश्यक किराणा सामानाची दुकाने,भाजी विक्रेते,दूध विक्रेते,औषध दुकाने व दवाखाने यांना वगळण्यात आले आहे. या व्यतिरिक्त शहरातील उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये केले.यावेळी तहसिलदार शरद गोसावी,सहायक पोलिस निरीक्षक पोरे,नायब तहसिलदार के.टी.भिगारे,उप नगराध्यक्ष शोएब हळदे,हॉटेल संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कापरे,सराफ संघटनेचे गौरव पोतदार,किराणा संघटनेचे फरीद मेमन,कपडा व्यापारी संघटनेचे सुरेश जैन,रणजीत जैन व इतर व्यापारी उपस्थित होते.या सभेमध्ये जो व्यापारी बंद आदेशचे उल्लंघन करील त्याचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
إرسال تعليق