श्रीवर्धन - देवखोलच्या कुसुमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात


कापोली : श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल येथील भाविकांचे श्रध्दास्थान व पांडवकालीन जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कुसुमेश्वर शिवमंदीरामध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीही शुक्रवार दि . २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला . सकाळी ७ - ४५ ला दीपराज कुसुमेश्वराची महापुजा बोलीपंचतन येथील सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ . राजेश धर्मा पाचारकर व त्यांच्या पत्नी आरती यांच्या हस्ते पार पडली . त्यानंतर दुग्धाभिषेक , पुजापाठ , शिवलिलामृत पोथीवाचन , किर्तन , प्रवचन व देवखोल येथील कुसुमेश्वर भजन मंडळाचे भजन असे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन कुसुमेश्वर सेवा मंडळ देवखोल यांच्यावतीने करण्यात आले होते . मंदिरामधे भाविकांची सकाळपासुन दर्शनासाठी गर्दी होती . मध्यरात्री १२ . २७ ते १ . १७ या वेळेत दीपराज कुसुमेश्वराचा भाविकांकडून जप केला जातो . दसऱ्या दिवशी मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते . देवखोल ' या गावातील प्राचीन पांडवकालीन शिवमंदिराची आख्यायिका अशी की , हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात एका रात्रीत बांधून काढलं अशी आख्यायिका आहे . हे स्थान फार प्राचीन आहे . पुराणामध्ये हरीहरेश्वराचा उल्लेख करताना उत्तरेला कुसुमेश्वर असा उल्लेख आढळतो . मंदिराचा परीसर मोठा रमणीय आहे . बाजूला एक छोटासा झरा आहे . सभोवताली गर्द वनराई , मंदिराला लागूनच लाल चिऱ्यांनी बांधून काढलेला हौद आहे व परिसरात छोटी तीन - चार मंदिरं आहेत . या परिसराचं आणखी एक वैशिष्ट्य खोदकामात सापडलेल्या दगडी मुर्त्या देवळाबाहेर रांगेने रचून ठेवल्या आहेत . या कुसुमेश्वर देवस्थानी भोवतालचा डोंगर , दाट झाडी यामुळे या ठिकाणी एका अनामिक व पवित्र शांततेची अनुभुती येते व येथून पाय निघत नाही.

पर्यटनस्थळात समावेश होण्याची मागणी दरम्यान या निसर्गरम्य व पौराणिक महत्व असलेल्या स्थळाचा एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे . . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा