(तळा किशोरपितळे)
तळा बाजारपेठेत वालाच्या शेंगा विक्रीसाठी दाखल झाल्याने बाजारपेठेत वालांच्या शेंगांना मागणी वाढली आहे. साधारणतः जानेवारी महिन्यात वालाची शेती बहरून शेंगा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होतात.मात्र उशिरापर्यंत लांबलेला पाऊस व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी उशिरा वालाची लागवड केली त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यात पहिल्या पंधरवड्यात मिळणाऱ्या वालाच्या शेंगा बाजारात दाखल होत असत पण यावेळी फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.कोकणात थंडीच्या दिवसांत पोपटी पार्टी मोठ्या प्रमाणात केल्या जातात या दिवसातशहरातील मंडळी गावाला येऊन मडक्यामध्ये पोपटी लावून कुटुंबासह पोपटीचा आनंद मनसोक्त आस्वाद लुटतात.पोपटी शाकाहारी व मासांहारी देखील करतात तर काही जण उकडुन सोबत ओले किंवा सुके खोबरं सोबत आस्वाद घेतात.मासांहारी मध्ये चिकन,अंडी, कांदा, बटाटा, मिठ,मसाला लावून
आरोग्यदायी असणाऱ्या भांबुरडीच्या पालाचे वेष्टन लावून हवशे नवशे मंडळी,जेष्ठ नागरिक,युवा पिढी आनंद घेतअसतात पोपटी पार्टी निमित्ताने कुटुंब एकत्र येऊन सुसंवाद साधतात.पोपटीत लागणाऱ्या वालांच्या शेंगां उशिरा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यामुळे वालाच्या शेंगा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली सध्या तळा बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने वालाच्या शेंगांची विक्री केली जात आहे.
إرسال تعليق