श्रीवर्धन -म्हसळा तालुक्यातील प्रवाशांची हेळसांड : लोकप्रतिनीधींचे होत आहे दुर्लक्ष प्रवाशांची तक्रार
अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शासनाने राज्यातील नागरिकांना कार्यक्षम दळण-वळण सुविधा निर्माण व्हावी याकरिता,''गांव तेथे रस्ता'',हे धोरण अंगिकारलेले आहे़ या धोरणास पूरक ''रस्ते तेथे एस़ टी़ '' अंसे धोरण महामंडळाने अंगिकारलेले आहे़. परंतु या धोरणाला प्रशासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते तिथे खड्डे आसे धोरण ठेवल्याने दोनही तालुक्यांतील अनेक ग्रामिण रस्ते खड्डेमय आसल्याने श्रीवर्धन आगाराने ग्रामिण भागातील फेऱ्या कमी केल्या तर भिवंडी, ठाणे, भांडुप,भाईंदर या फेऱ्या रद्द केल्या आसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहेत. श्रीवर्धन हून भिवंडी,बोर्ली -मुंबई, भाईंदर, ठाणे, भांडुप या गाडया पूर्ववत सुरु व्हाव्या या मागण्या प्रकर्षाने होत आहेत. नालासोपारा ते आंबेतमार्गे पांगळोली( रात्री १० किंवा सकाळी ६.०० वां ) व बोरिवली ते आंबेतमार्गे पांगळोली
सकाळी ६.वा. असावी अशी मागणी आंबेत खाडी पट्टा भागातील दाभोळ, आंबेत, संदेरी, विभागीय वाड्या, गडदाव, फळसप, आमशेत, लिपणीवावे, मरियम खार, कुडगांव, पांगळोली, तोराडी ईत्यादी गावांच्या प्रवासाची आहे.
श्रीवर्धन -म्हसळा- बोर्ली -दिघी- तुरूंबाडी- वारळ परिसरांतील अनेक कुटुंबे नालासोपारा- वसई विरार परिसरात वास्तव्यास आहेत.श्रीवर्धन आगाराने या मार्गावरील फेऱ्या कमी केल्याने गेले काही महीने या भागातील प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत.
" गेले काही महीनेआंबेत पूल बंद असल्याने मंडणगड, दापोली कडे जाणाऱ्या ST बस बंद आसल्याने या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींचे आंबेत खाडी पट्टा भागाकडे दुर्लक्ष होत आहे"
बबन भिकाजी उंडरे, पांगळोली.
"नागरीकानी एखाद्या मार्गासाठी एस.टी.ची मागणी केल्यावर मागणी अर्ज संबधीत अर्ज विभागाकडे न पाठविता प्रवाशांचे हीत लक्षात घेऊन नालासोपारा, भाईंदर अगर ठाणा डेपोकडून या मार्गावर गाडी सुरु करणे महत्वाचे आहे"
अनिल श्रीधर महामुनकर , अध्यक्ष प्रवासी संघटना, म्हसळा.
एस.टी.महामंडळाचे ''बहुजन हिताय व बहुजन सुखाय'' हे ब्रिद आहे. त्यामुळे माझा अगर कर्मचाऱ्यांचा प्रवाशाना त्रास हे आमचे धोरण नसते श्रीवर्धन आगारात उपलब्ध गाड्यांच्या तुलनेत विविध मार्गावर गाड्या चालविल्या जातात त्यासाठी उपलब्ध कर्मचारी ( ड्रायव्हर -कंडक्टर) कमी आहेत. कर्मचारी व गाड्यांची उपलब्धता झाल्यावर निकषानुसार गाडया सुरू करण्यात येतील"
मेहबूब जुनेद डेपो मॅनेजर , श्रीवर्धन
إرسال تعليق