म्हसळ्यात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ म्हसळ्यात रॅली


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी म्हसळा शहरात हिंदू संघटनेतर्फ आयोजन करण्यात आले होते यावेळी.हिंदू संघटनेच्या वतीने विशाल जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चे कऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही हे दोन कायदे भारतीय संसदेने लोकसभा व राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. या दोन्ही कायद्यांना समर्थनासाठी गुरुवारी सकाळी ११वा.एस.टी. स्टँड म्हसळा ते बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर समर्थन रॅली , तहसीलदार याना सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी याना हिंदू संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. नंतर म्हसळा ग्रामदेवता श्री धावीर देव पटांगणात आयोजकांमार्फत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे CAAव NRC चे तज्ञ मार्गदर्शक उमेश गायकवाड, भाजपाचे जिल्हा अध्यक्षअॅड. महेश मोहीते, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सचीन करडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, हिंदू संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव पाटील, शहर अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे, रा. कॉंग्रेसचे ता. अध्यक्ष समीर बनकर या विविध मान्यवरांनी केंद्राचे दोनही कायद्याचे समर्थन केले.

पंतप्रधान मोदी याना दिलेल्या निवेदनात केंद्रांत लोकसभा व राज्यसभेत हे दोन्ही कायदे मंजूर झाले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. हा कायदा कोणत्याही जाती-धर्माला विरोध करणारा नाही.या कायद्यामुळे सर्व भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असल्याने केंद्र शासनाने या दोन्ही कायद्यांची संपूर्ण देशात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही या कायद्याला पाठिंबा दर्शवित आहोत असे हिंदू संघटनेने म्हटले आहे.

हा कायदा खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांच्या सुरक्षितते करता महत्त्वाचा असून यामुळे देशात असलेल्या घुसखोरांना देशाबाहेर काढणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशातील अल्पसंख्याक ( गैर मुस्लीम)नागरिकांना हिंदू, शिख, पारशी व जैन याना आपल्या देशात नागरिकत्व देता येणे शक्य होणार असल्याने आम्ही हजारोंच्या संख्येने म्हसळा तालुक्यातील तमाम हिंदू समाज केंद्र शासनाच्या या दोन्ही कायद्यांचे जाहीर समर्थन करत आहोत .
उमेश गायकवाड यानी मुस्लीम धर्मीयांच्या देशद्रोही प्रचार व अफझलला समर्थन करण्याच्या धोरणावर कडक ताशेरे ओढताना संविधान बचाव चे खोटे नारे देणाऱ्यांचे भाबाडे काढले. आमचे संवीधान संसदेत संर्व सदस्य एकत्र झाले तरी बदलता येणार नाही असे सांगत . केंद्राने काश्मीर बाबत आणलेले ३७० व ३५ अ, सुप्रीम कोर्टने ४८५ वर्ष प्रलंबीत असणारा राम मंदीर, तीन तलाक या बाबतीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे विरोधकांच्या अस्तीत्वावर प्रश्न चिन्ह मिर्माण करणारे ठरले ह्यामुळे अंतरराष्ट्रीय पातळीवर चीन- पाकीस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर -ओवेसी एक होतात. त्याना काही अन्य मंडळी खतपाणी घालत आहेत या विरोधात आपण सर्वानी एकवटणे गरजेचे आसल्याचे आभ्यासू सांगितले . भविष्यात आपणच समान नागरी कायदा, जननी यंत्रणा कायद्या अस्तीत्वात आणण्याची मागणी लावून धरु असे गायकवाड यानी सांगितले.
सभेला कोणतेही साधन न पुरवता तालुक्यातून किमान ३ते ४ हजार हिंदू समर्थक उपस्थित होते.

रायगड पोलीसांचा होता चोख बंदोबस्त अतीरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली २ उपविभागीय पोलीस अधिकारी , ७ पोलीस निरीक्षक, २५ सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , आर.सी.पी. ३. तुकड्या, स्टाइकींग फोर्स २ तुकड्या, २०० पोलीस कर्मचारी, व ५० रिर्झव्ह कर्मचारी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तैनात करण्यात आले होते. शहरातील वाहतुक व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती.
उमेश गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे CAA व NRC चे तज्ञ मार्गदर्शक व वक्ते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा