राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ९० विद्यार्थी गुजरात राज्याचे आभ्यास दौऱ्यावर


राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ९० विद्यार्थी गुजरात राज्याचे आभ्यास दौऱ्यावर ; म्हसळा तालुक्यातील ३० विद्यार्थांचा समावेश.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2019-20 उपक्रमांतर्गत Exposure visit outside state या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील 9 शाळांतील 90 विध्यार्थी व 9 शिक्षक दि. २० फेब्रू ते २५ फेब्रू २०या काळात गुजरात राज्यात शैक्षणिक सहल व आभ्यास दौरासाठी गेले आहेत. यामध्ये रायगड जिल्हा परिषद प्रा. शाळा शाळा केलटे कांदळवाडा व चिखलप या शाळेचे प्रत्येकी १०प्रमाणे ३० विद्यार्थांचा सहभाग आसल्याचे गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे यानी सांगितले. निवड करताना करताना शैक्षणिक गुणवत्ता ,शाळा सिद्धी , इ.निकषामध्ये वरील म्हसळा तालुक्या तील तिन्ही शाळा अव्वल ठरल्या आसल्याने त्यांची निवड झाली. यामध्ये अलीबाग तालुक्यातील चरी,पेझारी, बेलपाडा व झिराड, रोहा तालुक्यातील घाटाव व महादेववाडी, ह्या शाळा आहेत.

सहल नेण्यामागील उद्देश व भेट
या योजनेला डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार योजना असे संबोधतात . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया विजन कार्यक्रमाचा हा एक भाग म्हणून ओळखला जातो.डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान योजने अंर्तगत विध्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून विज्ञान शिकवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून अन्य ठिकाणी शैक्षणिक,वैज्ञानिक, व्यापारी भूमीके तून भेटी देणे, विद्यार्थामधील विचारांचे देवाण - घेवाण होणे , शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्था व शाळाना भेटी व ओतीहासीक शहरे व मंदीराना भेटी व चर्चा. हा मुख्य उद्देश

पुढील ठीकाणी विद्यार्थी देणार भेटी.
डहाणू महालक्ष्मी मंदीर , भरुच निलकंठेश्वर मंदीर, आनंद- अमूल डेअरी,रणछोडदास मंदीर, स्टॅचू ऑफ युनिटी, नर्मदा सरोवर, लेझर शो, भारतातील प्रगत व औद्योगिक सुरत शहर आदी गुजरात राज्यांतील महत्वाच्या ठिकाणाना भेटी देण्यात येणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा